शेअर बाजार घसरणीदरम्यान हे दोन शेअर्स करतील मालामाल!

Stocks to Buy: शेअर बाजार(Share Market) घसरणीदरम्यान खरेदी करण्यासाठी 2 कंपन्यांचे शेअर्स (Shares) खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. बजेटपुर्वी (Budjet) खरेदी केल्यास शॉर्ट टर्ममध्ये तगडा नफा मिळू शकतो.
Stocks to Buy
Stocks to Buysakal
Updated on

Stocks to Buy: कोरोनाच्या काळात अनेक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात एंट्री करत चांगली कमाई केली. नवीन गुंतवणूकदारांना शेअर बाजारात (Share Market) पैसे गुंतवताना अनेक अडचणी येतात, पण बाजारातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही शेअर बाजारात खरेदी करू शकता. तुम्हीही शेअर मार्केटमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता. सेठी फिनमार्टचे एमडी आणि बाजार एक्सपर्ट विकास सेठींनी कॅश मार्केटमधील 2 मजबूत स्टॉक्स निवडले आहेत.

विकास सेठी यांची निवड-

मार्केट तज्ज्ञ विकास सेठी यांनी पॉवर मेक (Power Mech) व स्टर्लिंग आणि विल्सन (Sterling and Wilson) यांची निवड केली आहे. तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये चांगली कमाई करायची उत्तम संधी शोधत असाल, तर या दोन शेअर्सचा नक्की विचार करा असे त्यांनी म्हटले आहे.

Stocks to Buy
Tata Group च्या या स्टॉकवर तज्ज्ञांचा वाढता विश्वास

पॉवर मेक (Power Mech)-

विकास सेठी यांनी बजेट डोळ्यासमोर ठेवून पॉवर सेक्टरमधून पॉवर मेकची (Power Mech) निवड केली आहे. ही कंपनी वीज प्रकल्पांसाठी अभियांत्रिकी आणि बांधकाम सेवा पुरवते. त्याच वेळी, कंपनीचे फंडामेंटल्स चांगले आहेत.

सीएमपी (CMP) - 1002.90 रुपये

टारगेट (Target) - 1030 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 960

कंपनीचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल ?

गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत कंपनीने 28 कोटी रुपयांचा नफा कमावला. तर सप्टेंबर 2020 मध्ये कंपनीने 52 कोटी रुपयांचा झाला होता. त्याच वेळी, हा स्टॉक 10-11 च्या पीई मल्टिपलवर ट्रेडिंग करत आहे. त्याच वेळी, कंपनीमध्ये प्रमोटर्सची भागीदारी 64 टक्के आहे.

Stocks to Buy
AGS Transact IPO आजपासून खुला; गुंतवणूक करावी की नाही? जाणून घ्या

स्टर्लिंग आणि विल्सन (Sterling and Wilson)-

विकास सेठी यांनी दुसरा शेअर ऊर्जा क्षेत्रातून दिला आहे. या कंपनीने 34 देशांमध्ये आपला व्यवसाय पसरवला आहे. अलीकडेच, रिलायन्सने कंपनीतील 15-16 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. ही कंपनी सौरऊर्जा क्षेत्रात काम करते.

सीएमपी (CMP) - 406 रुपये

टारगेट (Target) - 430 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 390 रुपये

अर्थसंकल्पासाठी आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असताना या दोन शेअर्समधील गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांना आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com