लॉकडाऊनमध्ये वाढ केल्यास अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरेल: महिंद्रा

वृत्तसंस्था
Tuesday, 12 May 2020

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने सरकार पुन्हा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.देशातील गरिबांना सर्वाधिक फटका बसेल,असा इशारा महिंद्रा यांनी दिला आहे.

मुंबई  - केंद्र सरकारने चौथ्या  लॉकडाउनचे संकेत दिले आहेत. मात्र लॉकडाउन वाढविण्याबाबत महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने कोरोना रोखण्यासाठी 17 मेपर्यंत लॉकडाउनमध्ये वाढ केली. मात्र, तरीही देशातील कोरोना  ग्रस्तांची संख्या वाढत असल्याने सरकार पुन्हा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये आणखी वाढ केल्यास ते अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. देशातील गरिबांना याचा सर्वाधिक फटका बसेल, असा इशारा महिंद्रा यांनी दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

देशातील बहुतांश उद्योग गेल्या 40 दिवसांपासून बंद आहेत. अनेक उद्योगपतींनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून कारखाने सुरू करण्यासाठी सरकारकडे मागणी केली होती. महिंद्रा यांनी देखील अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी लॉकडाउन व्यापक स्तरावर शिथिल करण्याची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने लॉकडाउनच्या कालावधीत वाढ केली. आता  पुन्हा केंद्र सरकार  लॉकडाउन वाढविण्याचा विचार करते आहे. याबाबत आनंद महिंद्रा यांनी लॉकडाउन वाढवल्यास होणाऱ्या परिणामांची भीती ट्विटमधून व्यक्त केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दीर्घकालीन लॉकडाउन अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल. अर्थचक्र सुरु ठेवणे आवश्यक असून  समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आता मदतीची गरज आहे. लॉकडाऊन वाढल्यास त्यांचा जगण्याचा संघर्ष आणखी कठीण होईल, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे. 

देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढली आहे. मात्र कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता ठोस उपाय केले पाहिजेत. रुग्णालयांमध्ये पुरेशी यंत्रणा, मास्क , पीपीई किट , ऑक्सिजन सुविधा यासह इतर अत्यावश्यक साधनसामुग्री उपलब्ध हवी. नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension in lockdown would dangerous to economy, says Mahindra