esakal | FB चं अब्जावधी डॉलर्सचे नुकसान; शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले
sakal

बोलून बातमी शोधा

facebook app

FB चं अब्जावधी डॉलर्सचे नुकसान; शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Facebook Stock Falls : फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्स तब्बल सात तासानंतर सुरु झाली आहेत. सोमवारी सायंकाळी 8.45 वाजाता जगभरात तिन्ही अॅप ठप्प झाली होती. जवळपास 10 मिलियनपेक्षा जास्त युजर्सने अॅप ठप्प झाल्याची तक्रार केली होती. मंगळवारी पहाटे फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम पुन्हा सुरु झालं. फेसबुक आणि व्हॅट्सअॅपकडून याबाबत खेद व्यक्त करण्यात आलाय. मार्क झुकेरबर्ग यांनाही याबाबत युजर्सची माफी मागितली असून सेवा पुन्हा सुरळीत झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, सहा ते सात तास सर्व्हर डाऊन झाल्यामुळे फेसबुकला अब्जावधी डॉलर्सचा फटका बसला आहे. रात्रीत फेसबुकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळाली.

2019 मध्ये फेशबुक अशाच पद्धतीनं स्लोडाउन झालं होतं. तेव्हाही त्यांना मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा एकदा फेसबुकला मोठा फटका बसला आहे. भारतीय वेळेनुसार, सोमवारी रात्री पाऊने नऊ वाजल्यापासून फेसबूक ठप्प होतं. मंगळवारी पहाटे ते पुन्हा सुरु झालं. या कालावधीत युजर्सने ट्विटरवर तक्रारीचा सूर आवळला होता. स्लोडाऊनचं नेमकं काय कारण? याचा शोध कंपनीच्या वतीनं घेण्यात येत आहे. मात्र यामुळे शेअर्स गडाडले अन् कोट्यवधींचं नुकसान झालं. जुलै 2021 मध्ये फेसबुकचे शेअर्स एक ट्रिलियन डॉलर्स इतक्या मार्केट कॅप व्हल्यूपर्यंत पोहोचलं होतं. स्लोडाउनमुळे शेअर्सची किंमत घसरली असून 920 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. फेसबुक डाउन झाल्यानंतर गुंतवणूकधारकांनी आपले शेअर्स काढून घेतले. त्यामुळे कंपनीला अब्जावधी रुपयांचा फटका झाला.

Whistleblower च्या दाव्यानुसार, काही तासांसाठी फेसबुक, इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॅट्सअॅप ठप्प झाल्यामुळे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना 600 कोटी डॉलरचे (भारतीय चलनानुसार 4,47,34,83,00,000 रुपये) नुकसान झालं आहे. रिपर्ट्सनुसार, श्रीमंताच्या यादीतही झुकरबर्ग यांची घसरण झाली आहे. फेसबुक डाउन झाल्याचा फायदा बिल गेट्स यांना झाला आहे. झुकरबर्ग श्रीमंताच्या यादीत एका स्थानाने खाली घसरले आहेत.

सुरूवातीला काही काळ पावसामुळे इंटरनेट गेल्याची शंका निर्माण झाली होती, मात्र त्यानंतर फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप वगळता सर्व वेबासाईट्स सुरू असल्याचं दिसून आलं. यानंतर ट्विटर फेसबुक डाऊन, व्हाट्सअ‍ॅप डाऊन असे ट्रेंड देखील सुरु झाले. सेवा बंद झाल्यानंतर, फेसबुक वेबसाइटवर संदेश येत होता, 'सॉरी, काहीतरी गडबड आहे. आम्ही त्यावर काम करत आहोत आणि लवकरच ते दुरुस्त करू. अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरवर याबाबत तक्रार केली होती. व्हॉट्सअॅप वापरकर्ते मजकूर संदेश पाठवू किंवा प्राप्त करू शकले नाहीत. तसेच, व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलमध्येही समस्या होत्या.

सध्याच्या घडीला फेसबुक व्हॅट्सअॅप आणि इन्स्टाग्राम या तिन्ही प्लॅटफॉर्मने व्यवस्थित काम सुरू केले आहे. सेवा बंद झाल्याबद्दल कंपनीकडून खेद व्यक्त केला जातोय.

loading image
go to top