फेसबुक, व्हॉट्‌सॲपची सेवा पूर्ववत 

वृत्तसंस्था
Friday, 5 July 2019

अमेरिका आणि युरोपमध्ये बुधवारी दुपारी १२ पासून या तीनही ॲपची सेवा कोलडमली होती. त्याचा परिणाम भारतातदेखील संध्याकाळी जाणवू लागला होता. सेवा कोलमडल्याने युजर्सना फोटो, व्हिडिओ डाऊनलोड करता येत नव्हते. वापरकर्त्यांनी हजारो ट्विट्‌स केल्यानंतर सोशल मीडियाच्या जगात एकच खळबळ उडाली होती.

सॅन फ्रान्सिस्को - नियमित देखभाल दुरुस्तीदरम्यान तांत्रिक समस्येने काहीशी संथ झालेली फेसबुक, व्हॉट्‌सॲप आणि इन्स्टाग्रामची सेवा तब्बल १२ तासांनी पूर्ववत झाली. त्यानंतर या ॲपच्या कोट्यवधी वापरकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.

अमेरिका आणि युरोपमध्ये बुधवारी दुपारी १२ पासून या तीनही ॲपची सेवा कोलडमली होती. त्याचा परिणाम भारतातदेखील संध्याकाळी जाणवू लागला होता. सेवा कोलमडल्याने युजर्सना फोटो, व्हिडिओ डाऊनलोड करता येत नव्हते. वापरकर्त्यांनी हजारो ट्विट्‌स केल्यानंतर सोशल मीडियाच्या जगात एकच खळबळ उडाली होती. अखेर १२ तासांनी तांत्रिक दोष दूर करण्यात फेसबुकच्या तंत्रज्ञांना यश आले. बुधवारी मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटांनी (भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांनी) सर्व सेवा १०० टक्के कार्यान्वित झाल्याचे फेसबुकने जाहीर केले.

सेवा बाधित झाल्याने जगभरातील वैयक्तिक वापरकर्त्यांबरोबरच बड्या व्यावसायिकांना आणि कॉर्पोरेट कंपन्यांना फटका बसला. याप्रकरणी फेसबुकने दिलगिरी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook Whatsapp Instagram Service Start