
बदलत्या जीवनशैलीचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.
कठीण काळात Critical Illness Insurance येईल कामाला! अधिक जाणून घ्या
Critical Illness Insurance: बदलत्या जीवनशैलीचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. पूर्वीच्या तुलनेत आता गंभीर आजारांचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. कर्करोग आणि हृदयाशी संबंधित गंभीर आजार सर्रास ऐकू येतात. या आजारांवर उपचार करणेही तितकेच महागडे आहे. हा खर्च अनेक वेळा सर्वसामान्यांना परवडत नाही. अशा परिस्थितीत क्रिटिकल इलनेस प्लान (Critical Illness Insurance) हा एक चांगला पर्याय असू शकतो. या योजनेत गंभीर आणि जीवघेण्या आजारांवर कव्हर उपलब्ध आहे. कर्करोग, अर्धांगवायू, हृदयविकाराचा झटका, ट्यूमर, मूत्रपिंड निकामी होणे यासारख्या आजारांचा यात प्लॅनमध्ये समावेश आहे.
हेही वाचा: सोसायटीतील सदस्यांना घेता येणार Group Health Insurance
क्रिटिकल इन्शुरन्स प्लॅनचे (Critical Insurance Plans) फीचर्स
1. यात ट्यूमर, कॅन्सर, किडनी निकामी होणे, हृदयाशी संबंधित गंभीर आजार इत्यादी 36 गंभीर आजारांचा समावेश आहे.
2. कव्हर केलेल्या रोगासाठी एकरकमी रक्कम दिली जाते.
3. क्लेम करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.
4. प्रतीक्षा कालावधी (waiting Period) संपल्यानंतरच कव्हरेज उपलब्ध होते.
करात फायदा (Tax Benefit)
क्रिटिकल इलनेस पॉलिसी होल्डरला आयकर विभाग कायदा, 1961 अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. याशिवाय, आयकर, 1961 च्या कलम 80D अंतर्गत 15,000 रुपयांपर्यंतचा लाभ घेता येईल. या कलमांतर्गत ज्येष्ठ नागरिक 20,000 रुपयांपर्यंतचे लाभ घेऊ शकतात.
हेही वाचा: Crop Insurance: शेतकऱ्यांच्या मदतीला ‘शेतकऱ्यांची पोरं’
कोणते आजार कव्हर होतात ?
1. विशिष्ट अवस्थेतील कर्करोग
2. हृदयविकाराचा झटका (पहिल्यांदा)
3. ओपन हार्ट कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग
4. ओपन हार्ट रिप्लेसमेंट किंवा हार्ट व्हॉल्व्ह दुरुस्ती
5. निर्दिष्ट तीव्रतेचा कोमा
6. मूत्रपिंड निकामी होणे ज्यासाठी डायलिसिस आवश्यक आहे.
7. स्ट्रोक
8. बोन मॅरो ट्रान्सप्लांट
9. मेजर ऑर्गन ट्रांसप्लांट
10. लिंबसचा कायमचा अर्धांगवायू
11. मोटर न्यूरॉन रोग
12. मल्टिपल स्क्लेरोसिस
13. ऍप्लास्टिक अॅनिमिया
14. बॅक्टेरियल मेनिंजायटीस
15. एंड-स्टेज यकृत रोग
16. एंड-स्टेज फुफ्फुसाचा रोग
17. फुलमिनंट व्हायरल हेपेटायटीस
18. मेजर बर्न्स
19. मस्क्युलर डिस्ट्रॉफी
Web Title: Find Out More About The Critical Illness Insurance Plan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..