आरबळी (ता.तुळजापूर) : शिवारात सुमारे ५० कोटी रुपये गुंतवणुकीचा जैविक तंत्रज्ञानावर आधारित इंधन व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचे भूमीपूजन सोहळा शुक्रवारी (ता.१४) अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर करण्यात आला.
आरबळी (ता.तुळजापूर) : शिवारात सुमारे ५० कोटी रुपये गुंतवणुकीचा जैविक तंत्रज्ञानावर आधारित इंधन व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचे भूमीपूजन सोहळा शुक्रवारी (ता.१४) अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर करण्यात आला.

उस्मानाबाद जिल्ह्यात पहिला जैविक इंधन निर्मिती प्रकल्प होणार सुरु

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून प्रदुषण विरहित तुळजापूर तालुका, स्वावलंबी शेतकरी या उद्देशासह माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेवर आधारीत प्रकल्प आहे.
Published on

नळदुर्ग (जि.उस्मानाबाद) : सोलापूर (Solapur) - हैदराबाद (Hyderabad) राष्ट्रीय महामार्गावरील आरबळी (ता.तुळजापूर) शिवारात सुमारे ५० कोटी रुपये गुंतवणुकीचा जैविक तंत्रज्ञानावर (Bio Technology) आधारित इंधन व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचे भूमीपूजन सोहळा शुक्रवारी (ता.१४) अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर करण्यात आला. धरणे बायोफ्यूल (Dharne BioFuel), मीरा क्लीन फ्यूल्स प्रा. लि. (Meera Clean Fuels Private Limited) व पृथ्वी केअर प्रोड्यूसर कंपनी लि. (Prithvi Care Porducer Company) यांच्या संयुक्त विद्यमानातून हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे.सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून प्रदुषण विरहित तुळजापूर (Tuljapur) तालुका, स्वावलंबी शेतकरी या उद्देशासह माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेवर आधारीत प्रकल्प आहे. (First Bio-Fuel Project To Be Start In Osmanabad District)

आरबळी (ता.तुळजापूर) : शिवारात सुमारे ५० कोटी रुपये गुंतवणुकीचा जैविक तंत्रज्ञानावर आधारित इंधन व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचे भूमीपूजन सोहळा शुक्रवारी (ता.१४) अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर करण्यात आला.
औरंगाबादमधील नामांकित ४० टक्के इंग्रजी शाळा पडणार बंद! 'ही' आहेत कारणे

गजराज गवत, शेवाळ व कचऱ्यापासून जैविक इंधन निर्मिती केली जाणार आहे. यामुळे तुळजापूर तालुक्यातील शेतकरी स्वंयपूर्ण पूर्ण होणार आहे व परिसरातील असंख्य तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिलाच जैविक इंधन निर्मिती प्रकल्प असणार आहे. धरणे बायो फ्यूल प्रा. लि. व मीरा क्लीन फ्यूल्स लि. मुंबई या दोन कंपनीच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यात हा प्रकल्प उभारला जाणार आहे, तर पृथ्वी केअर प्रोडक्शन ही कंपनी शेतकरी व धरणे फ्यूल कंपनीमध्ये दुवा म्हणून काम करणार आहे. गजराज गवत, शेवाळ व कचऱ्यापासून इंधन निर्मिती होणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य प्रवर्तक सचिन धरणे यांनी दिली. यावेळी नगरसेवक बसवराज धरणे, सिद्रामप्पा मुरमे, डाॅ. संतोष पवार आदी उपस्थित होते. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com