आगीत तेल! जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ, कोरोनात महागाईचा स्फोट

आगीत तेल! जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ, कोरोनात महागाईचा स्फोट
Updated on

एक एप्रिलपासून २०२१-२२ या नवीन आर्थिक वर्षाला (New Financial year) सुरुवात झाली असून अनेक नियमांमध्येही बदल झालेले आहेत. काही वस्तूंच्या किंमतीमध्येही वाढ झाल्यामुळे आता अतिरिक्त पैसे भरावे लागणार आहेत. कोरोना महामारीमुळे आधीच कमकवुत झालेल्या सर्वसामान्यांपुढे एकप्रकारे महागाईचा स्फोटच झाला आहे. टिव्ही, एसी, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स, कार आणि बाइकसह अनेक वस्तू महागल्या आहेत. या सर्व वस्तूसह हवाई यात्रेच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. त्याशिवाय ऑटो कंपन्यांनी आपल्या अनेक प्रोडक्ट्सच्या किंमतीही वाढवल्यात. पाहूयात या आर्थिक वर्षात काय काय महागणार आहे.... 

हवाई यात्रा  -
एक एप्रिलपासून हवाई यात्रा महागणार आहे. नगर विमानन महानिदेशालयने (DGCA) विमान्याच्या तीकिटावरील एअरपोर्ट सिक्योरिटी फीस (ASF) वाढवली आहे. आंतरराज्य विमानाच्या तिकीटावरील ASF ची फीस १६० रुपयांवरुन २०० रुपये करण्यात आली आहे. तर आंतरराष्ट्रीय तिकिटावरील ASF ची फीस ५.२ डॉलरवरुन १२ डॉलर करण्यात आली आहे.  

फ्रीज आणि एसी -
फ्रीज आणि एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर गुरुवारपासून तुम्हाला जास्तची रकम चुकवावी लागेल. कंपन्यानं एसी आणि फ्रीजच्या किंमतीमध्ये पाच ते १० टक्केंची वाढ करण्याची घोषणा केली आहे. मेटल आणि कंप्रेसरच्या किंमती वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

कार आणि बाइक -
याशिवाय कार आणि बाइकच्या किंमतीही गुरुवारपासून महागणार आहेत. ऑटो कंपन्यांनी याआधीच एक एप्रिलपासून किंमत वाढणार असल्याचे सांगण्यात आली आहे. मारुती सुजुकीसह इतर कंपन्यानं आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत.  

टिव्ही - 
टिव्हीच्या किंमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे. पॅनासॉनिक (Panasonic), हायर (Haier) आणि थॉमसन (Thomson) कंपन्याच्या टिव्हीच्या किंमती महागल्या आहेत. गुरुवारपासून टिव्हीच्या किंमतीमध्ये दोन ते तीन हजार रुपये इतकी वाढ झाली आहे. तर ३२ इंचाच्या टिव्हीवर पाच ते सहा हजार रुपयांची वाढ झाली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com