Fixed Deposit : एफडी काढण्यापासून मोडण्यापर्यंत, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

गुंतवणुकीचा विषय येतो तेव्हा बँकांच्या सुविधांवर विशेषतः एफडीवर अधिक विश्वास दाखवला जातो.
Fixed Deposit : एफडी काढण्यापासून मोडण्यापर्यंत, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

Fixed Deposit : जेव्हाही आपल्या मनात गुंतवणुकीचा विषय येतो तेव्हा आपण दोन पातळ्यांवर विचार करतो. १) अधिक परतावा कसा मिळेल, २) आपली गुंतवणुक सुरक्षित कशी राहील? या दोन पातळ्यांवर विचार करताना बँकांच्या सुविधांवर विशेषतः एफडीवर अधिक विश्वास दाखवला जातो.

Fd म्हणजे काय?

Fd म्हणजे Fix Deposit.फिक्स म्हणजे निश्चित आणि डिपाँझिट म्हणजे जमा म्हणजेच एक अशी रक्कम जी एका निश्चित कालावधीसाठी ठाराविक आणि निश्चित व्याजदरावर आपण बँकेत जमा करत असतो.

एफ डी मध्ये आपण एका निश्चित कालावधीसाठी बँकेत पैसे जमा करत असतो.ज्यावर आपल्याला एक फिक्स व्याज दर देखील प्राप्त होत असते. यात आपण अशी रक्कम गुंतवणुकीच्या स्वरूपात एका निश्चित कालावधीसाठी १,२ किंवा ३ वर्षासाठी(आपल्या आवश्यकतेनुसार)बँकेत जमा करत असतो ज्यांची सध्या आपल्याला कुठलीही गरज नाहीये.

यात आपण जेवढ्या वर्षांसाठी एफडी केलेली असते ती आपण तेवढे वर्ष काढू शकत नसतो. शेवटी ती रक्कम त्यावर ५, ६ किंवा ८ टक्के इतके प्रत्येक बँकेत आपापल्या प्रमाणे एक फिक्स व्याजदर लावून आपल्याला दिली जात असते.

Fd Account कसे सुरू करावे?

  • बँकेकडून आपणास फॉर्म दिला जातो, जो आपण एकदा नीट वाचून व्यवस्थित कुठलीही खाडाखोड न करता भरायचा असतो.

  • मग त्या फॉर्मला आवश्यक ते महत्वाचे Documents जोडून तो फॉर्म आणि त्यासोबत आपले Deposit Amount बँकेत जमा करायचे असते.

  • याचसोबत आपण आँनलाईन एटीएम तसेच मोबाईल बँकिंगचा वापर करून देखील एफडी अकाऊंट ओपन करू शकतो.आणि डिपॉजिटची रक्कम देखील इंटरनेट बँकिंगचा वापर करून जमा करू शकतो.

Fd करण्याचे फायदे

● ठरलेल्या एका निश्चित कालावधीनंतर आपण जमा केलेल्या पुर्ण रक्कमेवर एक निश्चित व्याज लावून बँक आपल्याला एक फिक्स रक्कम यात आपल्या हातात देत असते.

● तसे पाहायला गेले तर एफडी मधील गुंतवलेले पैसे आपल्याला एका ठाराविक निश्चित कालावधीपर्यत बँकेतून काढता येत नसतात.

● पण समजा आपल्याला जर भविष्यात अचानक पैशांची गरज पडली किंवा अचानक काही आर्थिक अडचण आली तर अशा वेळेला आपण आपात्कालीन परिस्थितीत आपली एफडी मोडून तेच पैसे अडीअडचणीसाठी वापरू शकतो.

● आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे बचत खात्यात आपण जे पैसे जमा करतो त्यावर आपल्याला खुप कमी व्याजदर मिळत असते. पण एफ डी मध्ये पैसे जमा केल्यावर आपल्याला एक चांगले व्याजदर देखील मिळत असते.

● यात आपले पैसे एका फिक्स टाईम पिरीअडसाठी लॉक होऊन जात असतात. जे आपण भविष्यात अडीअडचणीत वापरू शकतो.

● Fd मध्ये जमा केलेली आपली रक्कम एकदम Safe आणि Secure राहते.

● Fd चा Time Period संपल्यानंतर आपण आपली Fdअजून जास्त कालावधीसाठी Renew करून अधिक व्याज प्राप्त करू शकतो.

Fd काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र

● पत्त्याचा पुरावा

● आधार कार्ड

● पॅन कार्ड

● पासपोर्ट साइज फोटो

● बँकेकडून दिला जाणारा एफडी फॉर्म

● एफडीसाठी कॅश अमाऊंट

आपणास Fix Deposit वर काही Monthly Interest प्राप्त होतो का?

  • जर आपण प्रत्येक वेळेला वेळोवेळी पैसे भरणे,मासिक वारंवारीतेची निवड केल्यास आपण Monthly Interest प्राप्त करू शकतो.

  • एफ डी मध्ये एक रक्कमी पैशांची बचत केली जात असते. यात आपण दर महिन्याला/तीन महिन्यांनी/सहा महिन्यांनी/वर्षभरानंतर एफडीची मुदत संपल्यावर व्याज प्राप्त करता येत असते.

  • यात आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे Interest प्राप्त करण्याचे Option निवडता येत असते.

  • यात असे व्यक्ती जे वयस्कर आहे आणि त्यांना दर महिन्याला पैशांची आवश्यकता असते. ते Monthly Interest चे Option Select करू शकतात.

  • आणि जे व्यक्ती तरूण आहेत ते मुदत संपल्यानंतर मुद्दल आणि व्याज प्राप्त करण्याचे Option Select करू शकतात.

Fd कशी मोडली जात असते?

आपात्कालीन परिस्थितीत आपण आपली एफडी दोन प्रकारे मोडू शकतो-

1) Offline :

2)Online :

1)Offline – आपल्याला जर आपले एफडी अकाऊंट बंद करायचे असेल तर आपण बँकेत जाऊन बँक मँनेजरशी बोलून आपले अकाऊंट बंद करू शकतो. यासाठी आपल्याला बँक मँनेजरला आपले एफडी अकाऊंट बंद करण्यासाठी एक अँप्लीकेशन द्यावा लागतो.

आणि आपण आपले एफडी अकाऊंट का बंद करतो आहे? त्याचे एक कारण देखील द्यावे लागत असते.

मग बँकेकडुन सर्व प्रोसेस पार पडत असते.आणि सर्व प्रोसेस पुर्ण झाल्यावर आपल्या बँक अकाऊंटमध्ये एफडीची सर्व रक्कम 24 तासाच्या आत जमा केली जात असते.

2)Online : इंटरनेट बँकिंगचा वापर करून देखील आपण आँनलाईन पदधतीने आपले एफडी अकाऊंट क्लोज करू शकतो. यासाठी आपल्याला पुढील Process Follow करावी लागले

● सर्वप्रथम बँकेच्या आँनलाईन पोर्टलवर जाऊन आपल्याला लॉग इन करावे लागेल.

● बँकेच्या पोर्टलवर लॉग इन करून झाल्यावर आपल्याला एक Home Page दिसेल. होम पेज वर जाऊन आपण Fix Deposit ह्या Option वर क्लिक करायचे असते.

● मग यांतर आपल्याला Service Request Section मध्ये जाऊन Premature Option वर क्लिक करायचे असते.

● यानंतर Next Option वर ओके करायचे.

● यानंतर आपले Fd Account Select करून Next Option वर ओके करायचे असते.

यानंतर आपली एफडी अकाऊंट क्लोज करण्याची Request बँकेकडे Send होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com