Flipkart वर बंपर ऑफर! मोबाईल, टिव्ही, लॅपटॉपसह अन्य वस्तूंवर मोठी सूट 

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 18 December 2020

Big Saving Days Sale मध्ये आपल्याला कोणता फोनवर किती सूट मिळेल? 

ई-कॉमर्स क्षेत्रातील लोकप्रिय असलेली कंपनी फ्लिपकार्टचा 18 डिसेंबरपासून बिग सेव्हिंग डेज सेल (Flipkart big saving days sale) सुरु झालाय. फ्लिपकार्टचा यंदाच्या वर्षातील  हा शेवटचा सेल आहे. 18 ते 22 डिसेंबर या कालावधीत ग्राहकांना याचा लाभ घेता येईल.

यात मोबाइल, टिव्ही, कॅमरा, स्मार्टवॉच, लॅपटॉप, हेडफोन्स, ईयरफोन्स, ईयरबड्स, फिटनेस बँड, ट्रिमर, स्पीकर्स, पावर बँक या सारख्या अन्य काही वस्तूंवर चांगली सूट मिळेल.  Samsung, Realme, Apple, Poco आणि Oppo या कंपनींसह अन्य काही बँडचे मोबाईल स्वस्तात खरेदी करण्यासाठी ग्राहकांना एक उत्तम संधी आहे.  

नियमांच्या पालनाने वाढेल स्टार्टअपचे आरोग्य

Big Saving Days Sale मध्ये आपल्याला कोणता फोनवर किती सूट मिळेल? 

>> यात रियलमी ( Realme 6i) चा स्मार्टफोन तुम्ही अवघ्या 12,999 रुपयांत खरेदी करु शकतात.  
>>  रियलमीचा मॉडल Realme Narzo 20 Pro  13,999 रुपयांत मिळेल. 
>> सेलच्या हंगामात रेडमीचा लोकप्रिय (Redmi 9i) केवळ 8,999 रुपयांत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 
>> Apple iPhone XR आणि iPhone SE वरही मोठी सूट देण्यात येत आहे. iPhone SE  32,999 रुपयांपासून पुढे तर iPhone XR को 38,999 रुपयांपासून उपलब्ध होणार आहे. 
>> फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये  लॅपटॉपवर 40 टक्के, हेडफोन आणि स्पीकरवर 70% टक्के, स्मार्ट वेअरबल्सवर 50 टक्के तर TV सेटवर 65 टक्केपर्यंत सूट मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flipkart make announcement for big saving days sale get huge discount on mobile phone tv other accessories