अन्नधान्याच्या भावात जुलैमध्ये घसरण

रॉयटर्स
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

रोम - जगात अन्नधान्याचे भाव जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात ३.७ टक्‍क्‍यांनी घसरले. मागील वर्षातील डिसेंबरनंतरची अन्नधान्याच्या भावातील ही सर्वांत मोठी घसरण आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संस्थेने (एफएओ) दिली आहे. 

‘एफएओ’ने जाहीर केलेल्या अन्नधान्य किंमत निर्देशांकानुसार, जुलैमध्ये तृणधान्ये, तेलबिया, दुग्ध उत्पादने, मांस व साखरेच्या भावातील बदल सरासरी १६८.८ अंश आहेत. जून महिन्यात याची सुधारित सरासरी १७५.३ अंश आहे. जुलैमध्ये अन्नधान्याच्या भावात घसरण होण्यास गहू, मका आणि तांदूळ यांची कमी निर्यात कारणीभूत ठरली आहे. दुग्ध उत्पादने, साखरेच्या भावात सर्वाधिक घसरण झाली आहे.

Web Title: food grains rate decrease