Currency : 'या' कारणांमुळे दोन दशकांत पहिल्यांदाच रोख स्वरूपातील चलनात घट

चलनात असलेल्या नोटा आणि नाण्यांचा वापरात सातत्याने घट होत आहे.
indian currency
indian currency Sakal

यंदा दिवाळीत चलनात असलेल्या नोटांमध्ये ७,६०० कोटी रुपयांची घट झाली आहे. दोन दशकांत प्रथमच असे घडले आहे. गुरुवारी एका अहवालात ही बाब समोर आली आहे. यात चलनात असलेल्या नोटा आणि नाण्यांचा समावेश आहे. एसबीआयच्या अर्थशास्त्रज्ञांच्या अहवालात असे म्हटले आहे की, लोकांमध्ये डिजिटल पेमेंटच्या लोकप्रियतेमुळे हे घडले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या संरचनात्मक बदल होत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, 2009 मध्ये दिवाळीच्या आठवड्यात चलनात 950 कोटी रुपयांची घसरण झाली होती. परंतु जागतिक मंदीमुळे असे घडले होते.

हेही वाचा : भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

अर्थशास्त्रज्ञ म्हणाले, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे भारतीय पेमेंट सिस्टममध्ये बदल घडवून आला आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता रोखीवर आधारित नसून स्मार्टफोन आधारित पेमेंटकडे वळली आहे. डिजिटल पेमेंट वाढल्यामुळे रोख चलन कमी होत आहे याचा फायदा बँकांना होत आहे. अहवालात डिजिटल साधनांना प्रोत्साहन देण्याचे श्रेय सरकारला दिले जात आहे. त्यानुसार, युपीआय, वॉलेट्स आणि (Prepaid Payment Instrument) सारख्या पेमेंट सिस्टमने डिजिटल पद्धतीने पैसे पाठवणे सोपे केले आहे. ज्यांचे बँक खाते नाहीत तेही सहज पैसे पाठवत आहेत. रिटेल डिजिटल व्यवहारांमध्ये UPI 16% टक्के, IMPS 12% टक्के आणि ई-वॉलेटचा वाटा सुमारे एक टक्का आहे.

indian currency
प्रॉव्हिडंट फंडच्या (PF) EPF, PPF आणि GPF खात्यात काय फरक आहे; वाचा सविस्तर

रोख स्वरूपातील पैशांत घट

पेमेंट सिस्टममध्ये रोख स्वरूपातील पैशांमध्ये सातत्याने घट होत आहे. 2016 मध्ये ते 88 टक्के होते, तर 2022 मध्ये ते 20 टक्क्यांवर आले आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2027 पर्यंत रोख स्वरूपातील चलन 11.15 टक्क्यांवर येऊ शकते. दुसरीकडे डिजिटल व्यवहारांचा वाटा सातत्याने वाढत आहे. 2016 मध्ये डिजिटल व्यवहार 11.26% वर होते. 2022 मध्ये 80.4% पर्यंत वाढले. 2027 पर्यंत ते 88 टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com