अर्थव्यवस्थेसंदर्भात माजी PM मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला दिल्या तीन टिप्स

ऑनलाइन टीम
Monday, 10 August 2020

सद्यपरिस्थितीत सरकारकडून आणखी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची गरज आहे, असे माजी पंतप्रधान आणि अर्थशास्त्रज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.  

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या संकटजन्य परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था बिकट अवस्थेत सापडली आहे. महा साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावापूर्वीच काही क्षेत्रे आर्थिक संकटाचा सामना करत होती. यात आता आणखी भर पडली असून मोदी सरकारसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे. अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी सरकारकडून अनेक उद्योगांना आर्थिक मदत दण्यात येत आहे. मोदी सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेजही जाहीर केले आहे. सद्यपरिस्थितीत सरकारकडून आणखी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची गरज आहे, असे माजी पंतप्रधान आणि अर्थशास्त्रज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मनमोहन सिंग यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदी सरकारला सल्ला दिला आहे. सरकारने सर्वप्रथम देशातील लोकांचा रोजगार सुरक्षित राहिल यावर भर द्यायला पाहिजे. लोकांना थेट पैसा देऊन त्यांच्या क्रयशक्ती (वस्तू खरेदी करण्याची क्षमता) वाढवण्याचा प्रयत्न सरकारने करायला हवा. याशिवाय त्यांनी सरकारच्या क्रेडिट गॅरेंटीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यापार उद्योगांना आवश्यक ती मदत पुरवण्याचा प्रयत्न करायला हवा, असेही सरकारला सुचवले.  फायनान्शिअल क्षेत्रात संस्थाग स्वायंत्तता आणि प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज आहे, याकडेही मनमोहन सिंग यांनी लक्ष वेधले. बऱ्याच दिवसांपासून देशात आर्थिक संकट घोंगावत होते, असेही त्यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भारतीय रिझर्व्ह बँकनेही कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्था अडचणीत सापडल्याचे संकेत दिले होते. कोरोनाजन्य परिस्थिती आणखी काही दिवस अशी राहिल्यास अर्थव्यवस्था बिकट होईल, असा अंदाज आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास व्यक्त केला होता. चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूनं देशात कहर माजवला आहे. दिवसागणिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मार्चपासूनच देशात लॉकडाउन सारखा कठोर नियम लागू करण्यात आला होता. याचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former pm mamohan singh suggests modi government ensure economic stability