esakal | FPI मार्फत आतापर्यंत भारतीय शेअर बाजारात 1,997 कोटी गुंतवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Investment

FPI मार्फत आतापर्यंत भारतीय शेअर बाजारात 1,997 कोटी गुंतवणूक

sakal_logo
By
ओमकार वाबळे

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय) भारतीय बाजारातील शेअर मार्केटमधील खरेदी वाढवताना दिसत आहेत. येत्या 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान एफपीआयने भारतीय बाजारात 1,997 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. यामुळे भारत हा एक दीर्घकालीन दृष्टीकोनातून एफपीआयसाठी आकर्षक गुंतवणूक बाजार ठरत असल्याचं दिसतं. एफपीआय मार्फत देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली आहे.

डिपॉझिटरी आकडेवारीनुसार, एफपीआयने ऑक्टोबरमध्ये इक्विटीमध्ये 1,530 कोटी आणि कर्ज किंवा बॉण्ड मार्केटमध्ये 467 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अशा प्रकारे त्यांची निव्वळ गुंतवणूक 1,997 कोटी रुपये झाली आहे.

सप्टेंबरमध्ये 26,517 कोटी भारतीय बाजारात गुंतवले

यापूर्वी एफपीआयने सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारात 26,517 कोटी आणि ऑगस्टमध्ये 16,459 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. अलिकडच्या आठवड्यात एफपीआयने बँकिंग क्षेत्रातून त्यांची गुंतवणूक काढून घेतली आहे आणि आयटी क्षेत्रात गुंतवणूक वाढवली आहे, असे यावरून दिसते. यासंदर्भात न्यूज १८ने वृत्त दिले आहे.

गुंतवणुकीबाबत सावध रहा

इक्विटी मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की केवळ दीर्घकालीन गुंतवणूक आपल्याला चांगला परतावा देऊ शकते. अल्पकालीन दृष्टिकोनातून इक्विटीज खूपच अस्थिर असतात. अल्प मुदतीच्या गुंतवणूकीत, इक्विटीमध्ये प्रचंड अस्थिरता तुम्हाला गुंतणुकीपासून लांब नेऊ शकते. जेव्हा आपण गुंतवणुकीमार्फत बाजारात दीर्घकाळ राहता, तेव्हा बाजारातील चढउतारांचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो.

loading image
go to top