भारतीय कंपनी फ्रेशवर्क्सचा यूएस स्टॉक एक्सचेंजमध्ये डंका

Freshworks
Freshworksesakal
Summary

फ्रेशवर्क्सचा आयपीओ बुधवारी नॅस्डॅक ग्लोबल सिलेक्ट मार्केटमध्ये लिस्ट झाला.

- शिल्पा गुजर

भारतीय सॉफ्टवेअर-एज-ए-सर्व्हिस (SaaS) कंपनी फ्रेशवर्क्सने बुधवारी इतिहास रचला. फ्रेशवर्क्स ही पहिली भारतीय सास (SaaS) कंपनी बनली आहे, ज्यांचे शेअर्स यूएस स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झाले आहेत. बुधवारी, फ्रेशवर्क्सचा आयपीओ नॅस्डॅक (Nasdaq) ग्लोबल सिलेक्ट मार्केटमध्ये लिस्ट झाला. “एखाद्या भारतीयाने ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे” अशी भावना फ्रेशवर्क्सचे सहसंस्थापक गिरीश मातृबुतम यांनी दिली.

Freshworks
EVRE उभारणार 10 हजार चार्जिंग स्टेशन्स; तरुणांसाठी रोजगाराची नवी संधी

व्यवसाय सॉफ्टवेअर निर्माता फ्रेशवर्क्सचा आयपीओ 2021 च्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयपीओपैकी एक आहे. कोरोना महामारीनंतर वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे सास (SaaS)उद्योगात बरीच वाढ झाली आहे. फ्रेशवर्क्स आणि त्याचे सहसंस्थापक गिरीश मातृबुतम यांना भारतीयसास (SaaS)उद्योगाचा चेहरा म्हटले जाते.

Freshworks
HDFCकडून 'या' दराने मिळतंय फेस्टिव्ह होम लोन! ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंतच

“भारताची ग्लोबल प्रोडक्ट कंपनी काय साध्य करू शकते हे आम्ही जगाला दाखवत असल्याचे गिरीश मातृबुतम म्हणाले. नॅस्डॅक (Nasdaq)मार्केट साईटवर लिस्टिंगच्या वेळी आयोजित बेल समारंभादरम्यान ते बोलत होते. अमेरिकन बाजारात अशी उंची गाठणारे आम्ही पहिले भारतीय आहोत, याची जाणीव आहे. आम्हाला अधिक आनंद देते आहे, फ्रेशवर्क्ससाठी ही एक नवीन सुरुवात आहे, असेही गिरीश म्हणाले.

Freshworks
टाटा, जिंदाल, हिंडाल्कोच्या शेअर्समध्ये मोठी घसरण!

कंपनीची सुरुवात 2010 मध्ये गिरीश मातृबुतम आणि शान कृष्णासामी यांनी फ्रेशडेस्क (Freshdesk) म्हणून केली होती. 2017 मध्ये ते नाव बदलून फ्रेशवर्क्स (Freshworks) करण्यात आले. त्याच्या गुंतवणूकदारांमध्ये एक्सेल (Accel),सिकोईया कॅपिटल (Sequoia Capital)आणि टायगर ग्लोबल (Tiger Global)यांचा समावेश आहे. आयपीओपूर्वी फ्रेशवर्क्सचे मूल्य 10 अब्ज डॉलर होते.

कंपनीने आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर 36 डॉलरची किंमत निश्चित केलीआहे. कंपनीचे चिन्ह "FRSH"आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com