esakal | इंधन दरवाढीचा भडका; जाणून घ्या तुमच्या शहारातील पेट्रोल- डिझेलचे भाव
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol price hike

इंधन दरवाढीचा भडका; जाणून घ्या तुमच्या शहारातील पेट्रोल- डिझेलचे भाव

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे : एका दिवसाच्या विश्रांतीनंतर गुरुवारी(ता.27) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये अचानक पुन्हा दरवाढ झाली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने गुरवारी(ता.27) नव्वा उच्चांक गाठला आहे. देशाच्या राजधानीमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये 24 पैशांनी तर, डिझेलच्या किंमतीमध्ये 29 पैशांनी वाढ झाली आहे. मे महिन्यात गेल्या काही दिवसामध्ये झालेल्या दरवाढीनुसार राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्रामध्ये पेट्रोलच्या किंमतीने शतक पार केले आहे. या महिन्याच्या सुरवातीस, भोपाळ ही देशातील पहिली राजधानी ठरली जिथे पेट्रोलच्या दरवाढीमध्ये शतक पार केले होते. पेट्रोलचे दर प्रतिलिटर 100.17 पर्यंत पोहोचल्यानंतर जयपूरने आज ऐतिहासिक टप्पा गाठला. भारतामध्ये 5 राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर सातत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. 18 दिवसांमध्ये प्रतिलिटर पेट्रोल 3.28 रुपयांनी आणि डिझेल 3.88 रुपयांनी महागले.

हेही वाचा: भारतीय युजर्सवर परिणाम नाही; प्रायव्हसीबाबत केंद्राचा खुलासा

दिल्ली पेट्रोलचे दर प्रतिलिटर 93.68 रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर 84.61 रुपये झाले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 99.94 रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर 91.87 रुपये झाले आहेत. भोपाळमध्ये पेट्रोलचे दर 101.77 प्रतिलिटर रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर 93.07 रुपये इतके झाले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 95.28रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर 89.39 रुपये इतके झाले आहेत. कोलकत्त्यामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 93.72 रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर 87.46 रुपये इतके झाले आहेत. पुण्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 99.89 रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर 90.41 रुपये इतके झाले आहेत. बंगळुरुमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 96.80 रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर 89.70 रुपये इतके झाले आहेत. हैदराबादमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 97.36 रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर 92.24 रुपये इतके झाले आहेत.पटनामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 95.85 रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर 89.87 रुपये इतके झाले आहेत.जयपूरमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 100.17 रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर 93.36 रुपये इतके झाले आहेत.लखनऊमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 91.21 रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर 85.00 रुपये इतके झाले आहेत.तिरअऩंतपुरममध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 91.21 रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर 85.00 रुपये इतके झाले आहेत.

हेही वाचा: अपहरण, खुनी हल्ल्याप्रकरणी आमदार पुत्राला अखेर अटक

भारतामध्ये प्रत्येक राज्यातील इंधनांच्या किंमती त्या त्या राज्यात आकारल्या जाणाऱ्या स्थानिक कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्कानुसार वेगळ्या असतात.

आपल्या शहरात काय आहेत भाव? (How to check petrol-diesel price)

पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.

दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती (how to decide price of petrol and diesel)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती दररोज बदलत असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. परकीय चलनांसहित आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती काय आहेत या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात.