नव्या घराचे स्वप्न पूर्ण करा, 'सकाळ मनी'च्या माध्यमातून

नव्या घराचे स्वप्न पूर्ण करा, 'सकाळ मनी'च्या माध्यमातून

नवे घर घ्यायचे आहे. पण, पैसे कुठून आणायचे? नवा व्यवसाय सुरू करायचा आहे. पण, भांडवल कुठून आणायचे? मालमत्ता आहे. पण, ती तारण ठेवून कर्ज कसे मिळवायचे? वैयक्तिक खर्चासाठी "पर्सनल लोन' हवे आहे. पण, सहजपणे ते कुठून आणि कसे मिळणार? 

असे किंवा यासारखे प्रश्‍न अनेकांच्या मनात येत असणार. त्यावर उपाय कसा आणि कोठून शोधायचा, हाही प्रश्‍न नक्कीच सतावत असणार. पण, यापुढे ही चिंता करण्याचे कारण नाही... कारण, आर्थिक सेवाक्षेत्रात आक्रमकपणे विस्तार करणाऱ्या "सकाळ मनी'ने सर्व स्तरातील कुटुंबांना स्वप्नपूर्तीची संधी देऊ केली आहे. "सकाळ मनी'ने गुंतवणुकीच्या चांगल्या पर्यायांबरोबरच आता आकर्षक दरात कर्ज मिळवून देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

सर्वसामान्य नागरिकांची आणि त्यांच्या कुटुंबाची गरज ओळखून नोकरदार, व्यापारी-उद्योजकांना विविध प्रकारचे कर्ज मिळवून देण्यासाठी "सकाळ मनी'ने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. यासाठी देशातील आघाडीच्या बॅंका तसेच बिगरबॅंकिंग वित्तीय कंपन्यांशी सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्यात आले आहेत. याअंतर्गत अल्प व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृहकर्ज, स्टेप-अप, टॉप-अप गृहकर्ज, मालमत्तेच्या बदल्यात कर्ज, गुंठेवारी कर्ज, दुकान किंवा शोरूमसाठी कर्ज, लीज रेंटल डिस्काउंटिंग, व्यावसायिक जागेच्या खरेदीसाठी कर्ज, डॉक्‍टर वा चार्टर्ड अकाउंटंट यासारख्या व्यावसायिकांसाठी विशेष कर्ज, इन्कम टॅक्‍स किंवा जीएसटी रिटर्न्स नसणाऱ्या वर्गासाठी कर्ज आणि ओव्हर ड्राफ्ट (ओडी) अशा विविध प्रकारच्या पर्यायांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रत्येकाला, इतकेच नव्हे तर प्रत्येक कुटुंबाला आपले स्वप्न साकार करता येणार आहे. 

सर्वांना हक्काचे घर मिळणार 

आपण कोणत्याही उत्पन्न गटातले असलात, तरी त्यावरील पर्याय "सकाळ मनी'कडे असेल. आपले स्वप्न नवे घर घेण्याचे असो किंवा राहत्या घराचे नूतनीकरण करण्याचे असो किंवा नवा व्यवसाय सुरू करण्याचे असो, ते आता सहजपणे पूर्ण करता येणार आहे. अगदी ज्यांना रोख स्वरूपात पगार मिळतो, अशा घरकामगार, मोलकरीण, नोकर, स्वयंपाकी, ड्रायव्हर आदींनाही घरमालकांच्या पत्राच्या आधारे काही बॅंका गृहकर्ज देऊ लागल्या आहेत. अशा कर्जाचे हप्ते नियमितपणे भरणाऱ्यांना काही बॅंका 12 हप्ते माफही करतात. त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांनाही आता आपले हक्काचे घर घेता येणार आहे.

तसेच, पहिलेच घर घेणाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खास अनुदानही मिळत आहे. यासाठीच्या पात्र नागरिकांना सुमारे 2.67 लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेता येणार आहे. याचबरोबर आपल्या कारकिर्दीची नुकतीच सुरवात केलेल्या तरुण मंडळींना मोठे घर घेण्याची इच्छा असेल, तर स्टेप-अप गृहकर्जाचा अभिनव पर्याय मिळू शकणार आहे. यामुळे कर्जदाराला सुरवातीच्या वर्षांत कमी रकमेचा हप्ता आणि पगार वाढल्यानंतर वाढत्या रकमेचा हप्ता भरता येणार आहे.

कर्जाने घेतलेल्या घराचे नूतनीकरण करायचे असेल किंवा नवे फर्निचर घ्यायचे असेल, तरीही अनेक बॅंका विद्यमान कर्जदारांना टॉप-अप कर्ज किंवा ओव्हर ड्राफ्ट देऊ करीत आहेत. त्याचाही फायदा उठविता येऊ शकणार आहे. ज्या पगारदारांना व्यावसायिक मालमत्ता खरेदी करून भाड्याच्या उत्पन्नाचा नवा पर्याय जोडून घ्यायचा असेल, त्यांना कर्जाचे नवनवे पर्याय उपलब्ध आहेत. त्याशिवाय, स्वतःच्या मालमत्तेच्या बदल्यात कर्जाची सुविधाही मिळू शकणार आहे. हे सर्व पर्याय पाहता रिअल इस्टेटमध्ये प्रवेश करण्याची आपली आणि आपल्या कुटुंबाची मनोकामना "सकाळ मनी'च्या सहकार्याने निश्‍चितपणे पूर्ण होणार आहे. 

नवउद्योजकतेला प्रोत्साहन 

प्रत्येकाला निवारा देण्याबरोबरच नवउद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे धोरण सर्वत्र अवलंबिले जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन "सकाळ मनी'ने "बिझनेस लोन', तसेच "पर्सनल लोन'वरही भर देण्याचे ठरविले आहे. व्यवसायाच्या नवनव्या संकल्पना समोर घेऊन येणाऱ्या कल्पक उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी "कस्टमाइज्ड लोन सोल्युशन' पुरविले जाणार आहे.

बॅंक खात्यात सरासरी चांगली शिल्लक राखणाऱ्या, परंतु आयटीआर किंवा जीएसटीआर नसणाऱ्या मंडळींनाही आता कर्ज मिळू शकते आणि तसा पर्याय "सकाळ मनी'च्या माध्यमातून समोर आलेला आहे. त्याचा लाभ नवउद्योजकांना घेता येणार आहे. 

"सकाळ मनी'ने उपलब्ध करून दिलेल्या विविध कर्जप्रकारांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी 7447450054 या दूरध्वनी क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर संबंधितांशी स्वतंत्रपणे संपर्क साधला जाणार आहे. थोडक्‍यात, आपल्या स्वप्नपूर्तीची ही अनोखी संधी "चुकवू नये' अशीच म्हणावी लागेल. 

"सकाळ मनी'ने सहकार्याचे संबंध प्रस्थापित केलेल्या बॅंका आणि वित्तीय संस्था 

स्टेट बॅंक, एचडीएफसी लि., आयसीआयसीआय बॅंक, स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, येस बॅंक, कोटक बॅंक, फेडरल बॅंक, आयडीएफसी बॅंक, पूनावाला फायनान्स, बॅंक ऑफ महाराष्ट्र, एलआयसी हाउसिंग फायनान्स, टाटा कॅपिटल, इंडियाबुल्स, पिरामल हाउसिंग फायनान्स, आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स, फूलरटोन, निओ ग्रोथ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com