भारत ते अमेरिका: आर्थिक सल्लागार क्षेत्राचा प्रवास

india-US
india-US

मी, माझ्या कुटुंबासोबत जवळपास आठ वर्षांपूर्वी, माझ्या पतीच्या नोकरीमुळे अमेरिकेत वास्तव्यास गेले. अमेरिकेला जाण्यापूर्वी एल अँड टी म्युच्युअल फंड कंपनीमधील मॅनेजरची नोकरी मला सोडावी लागली. मी या कंपनीत बँकिंग चॅनेल्स आणि गुंतवणूकदारांसाठी काम करत होते. एल अँड टीच्या आधी, मी आनंद राठी सिक्युरिटीज् (नागपूर), आयएल अँड एफएस इन्व्हेस्ट मार्ट लि. (पुणे) आदी विविध वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांसाठीही काम केले होते. मी माझ्या कामाच्या कालावधीत विविध गुंतवणुकींबद्दल बरेच काही शिकले. मी बऱ्या‍च वेगवेगळ्या गुंतवणूकदारांना भेटू शकले, गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे महत्त्व, गुंतवणूक कशी करावी, याबद्दल शिकवू शकले. मुळातच मला वैयक्तिक वित्त (पर्सनल फायनान्स) या विषयात नेहमीच रस होता आणि आवड होती. मी सध्या ‘फंड-मॅटर्स’ या वित्तीय सेवा संस्थेची संस्थापक आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पहिली नोकरी धरण्याआधी मी माझे पदव्युत्तर पदवी शिक्षण एमबीए (फायनान्स) केले. एमबीए दरम्यान माझा प्रोजेक्ट म्युच्युअल फंडावर होता. म्हणून मला वाटते, कदाचित तिथूनच मी म्युच्युअल फंड आणि इतर आर्थिक गुंतवणुकीकडे उत्सुकतेने पाहण्यास सुरवात केली.

असा जवळपास पाच वर्षांचा कॉर्पोरेट अनुभव घेऊन मी अमेरिकेत आले. सुरवातीचा काही महिन्यांचा वेळ येथे स्थिरस्थावर होण्यात गेला. नंतर मात्र माझी आवड मला स्वस्थ बसू देईना, म्हणून मी गुंतवणुकीवर ‘ब्लॉगिंग’ करायला सुरवात केली. मी विविध गुंतवणुकीच्या विषयांवर लिहायला लागले आणि मला अतिशय चांगला प्रतिसाद मिळायला लागला. ‘ब्लॉगिंग’बरोबर मी ‘एनआरआय गुंतवणूक व टॅक्स’, ‘अमेरिकेमधील गुंतवणूक पर्याय’ या विषयाचा अभ्यास देखील सुरु केला. तसेच वार्षिक भारतभेटी दरम्यान, मी अॅडव्हायझरी क्षेत्रातील ‘एनआयएसएम’च्या काही परीक्षाही दिल्या, ‘आरआयए’ ही मागच्या वर्षी मी दिलेली परीक्षा.

माझ्या ‘ब्लॉगिंग’ला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे मी अजून एक पुढचे पाऊल घेऊन ‘फंड-मॅटर्स’ ही आर्थिक सल्लागार फर्म सुरु केली. माझी फर्म अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि भारतातील गुंतवणूकदारांना विविध गुंतवणूक आणि आर्थिक सेवा प्रदान करते. ‘फंड-मॅटर्स’मध्ये आम्ही नवीन तंत्रज्ञान वापरतो, ज्याद्वारे जगभरातील आमच्या गुंतवणूकदारांना आपले उद्दिष्ट साध्य करणे सुलभ होते. आम्ही ऑनलाईन अपॉईंटमेंट सर्व्हिस, भारतीय म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी कागदपत्रांची ऑनलाईन प्रक्रिया, ऑनलाइन इंडिया टॅक्सेशन सर्व्हिस आणि इतर काही सेवा प्रदान करतो. म्हणूनच आज मी केवळ माझ्या भारतीय गुंतवणूकदारांनाच नाही, तर यूएसए, कॅनडा, जर्मनी, यूएई, ऑस्ट्रेलिया आदी विविध देशांमधील गुंतवणूकदारांनाही ऑनलाइन सेवा ‘फंड-मॅटर्स’द्वारे पुरविण्यास सक्षम आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माझ्या या प्रवासात मला काही समस्याही आल्या, कारण इथे राहून भारतातील गुंतवणूक, टॅक्स, शेअर बाजार याबद्दल अद्ययावत माहिती ठेवण्यात त्रास व्हायचा. गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष न भेटता, फोन, ई-मेल वरून मार्गदर्शन करणे, म्युच्युअल फंड कंपन्यांकडे ‘फॉलोअप’ घेणे, हे कधीकधी कठीण जायचे.

पण या प्रवासात मी बऱ्याच लोकांशी जोडली गेले, जे मूळचे भारतातील आहेत. यापैकी बरेच जण मला फेसबुकवरील पर्सनल फायनान्स ग्रुप, कोरा प्लॅटफॉर्म आदींवर भेटले. त्या सर्वांनी मला प्रोत्साहन दिले, मला भारतीय बाजाराविषयी अद्ययावत राहण्यास मदत केली. या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याने मला नवनवीन गोष्टी शिकण्याची, प्रतिभावान व्यक्तींबरोबर ‘कनेक्ट’ करण्याची संधी दिली. या प्रवासात माझे पती, मुलगी आणि कुटुंबीयांनी मला खूप सहकार्य केले आणि माझ्या निर्णयाच्या प्रत्येक टप्प्यावर ते माझ्याबरोबर होते. त्यांच्या प्रोत्साहन आणि पाठिंब्याशिवाय हा प्रवास शक्य नव्हता.

आर्थिक सल्लागार क्षेत्रातील एक व्यक्ती म्हणून हा माझा भारत ते अमेरिकेचा प्रवास उत्साह वाढविणारा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com