घराबाहेर न पडताच तुम्ही मिळवू शकता, तात्काळ पर्सनल लोन

get personal loan while you are at home bajaj finserv
get personal loan while you are at home bajaj finserv

100% ऑनलाइन डिस्बर्सल आणि नो-टच प्रोसेसिंग यांच्या आधारे बजाज फिनसर्व्हसारख्या लोन देणाऱ्या कंपन्या इन्स्टंट फायनान्सिंग तुमच्या दारात घेऊन आल्या आहेत. 

पर्सनल लोन हा कायमच नियोजित किंवा अनियोजित खर्च भागवण्याचा एक उपयुक्त मार्ग राहिला आहे. अचानक कोसळलेली वैद्यकीय आपत्ती असो, कर्जाचा वाढत चाललेला डोंगर असो की तुमच्या मुलांच्या उच्चशिक्षणाच्या गरजा असोत; तुम्हाला जेव्हा निधीची गरज असते, तेव्हा वैयक्तिक कर्ज हे तातडीने मिळणारे निधीचे इंजेक्शन ठरू शकते. 

पारंपरिक व्यवहारात तुम्हाला बँकेच्या किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीच्या शाखेला भेट द्यावी लागेल, लांबलचक फॉर्म भरून आणि अनेक कागदपत्रे सादर करून तुमची पात्रता सिद्ध करावी लागेल आणि आपला अर्ज मंजूर व्हावा या आशेने वाट पाहावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला ज्याची गरज आहे ते पैसे मिळतील.

तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत गेले, तसतसे आघाडीच्या ऋण देणाऱ्या कंपन्यांनी वैयक्तिक कर्ज काढणे सोपे केले. आधी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी केली गेली आणि नंतर मंजुरीला वेग दिला गेला आणि पैसे वाटपासाठी लागणारा वेळ कमी केला गेला. 

बहुतेक ऋणदात्यांनी गेली काही वर्षे हीच पद्धत अवलंबलेली असली तरी काहींनी यापुढची पायरीही गाठली आहे. बजाज फिनसर्व्हचेच उदाहरण घ्या. बजाज फायनान्स लिमिटेड या ऋणदात्या शाखेच्या माध्यमातून या नॉन-बँकेने इन्स्टंट फायनान्सिंग शक्य केले आहे. कोणत्याही शाखेला भेट न देता, कोणताही अर्ज सादर न करता किंवा कसलेही कागदोपत्री व्यवहार न करता तुमच्या खात्यात पैसे तात्काळ जमा होतात… अगदी लगेचच्या लगेच. 

खरे सांगायचे तर तुम्हाला तुमच्या घराची पायरीही ओलांडावी लागत नाही. होय, हे खरे आहे, बजाज फिनसर्व्ह 100% ऑनलाइन व्यक्तिगत कर्ज उपलब्ध करून देते, तेही नो-टच व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून आणि तात्काळ पैसे खात्यात जमा करून. याचाच अर्थ असा की तुम्ही आपल्या स्मार्टफोनच्या साह्याने वैयक्तिक कर्ज काढू शकता आणि पैसे काही मिनिटांत मिळवू शकता- कोणत्याही प्रतिनिधीला न भेटता आणि जवळपास काहीही न करता. 

तुमचा बजाज फिनसर्व्हशी काही संबंध असेल तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी फक्त दोन क्लिक्सची गरज भासते! बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनच्या माध्यमातून तुमची पैशांची गरज किती साध्या-सोप्या पद्धतीने भागवली जाते, पाहा. 

1.    तुमच्या खात्यात तात्काळ पैसे मिळवा
पात्रतेचे निकष पूर्ण करून तुम्ही बजाज फिनसर्व्हकडून इन्स्टंट पर्सनल लोनसाठी पूर्व-मान्यताप्राप्त ग्राहक ठरलात की तुमच्या अकाउंटमध्ये कमीत कमी वेळात, अगदी 20 मिनिटांत कर्जाची रक्कम जमा होते. या गतिमान आणि 100% ऑनलाइन डिस्बर्सलमुळे तुमच्या अनपेक्षित किंवा अनियोजित खर्चांच्या गरजा अजिबात वेळ न दवडता तात्काळ भागवल्या जातात. 

2.    पेपरलेस मंजुरी प्रक्रियेचा आनंद घ्या 
इन्स्टंट पर्सनल लोनसाठी अर्ज अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सरळ सोपी आहे. तुम्हाला आधीच भरण्यात आलेल्या अर्जातील तुमचे तपशील फक्त तपासून द्यायचे असतात आणि गरज पडल्यास काही तपशील नव्याने द्यायचे असतात. सगळे काही ऑनलाइन आणि नो-टच प्रोसेसने होते. आणखी सोयीची गोष्ट म्हणजे विद्यमान ग्राहकांसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नसते, त्यामुळे तुम्ही पेपरलेस अॅप्रूव्हल आणि अर्ज भरण्याचा आनंद घेऊ शकता. यामुळे सगळी प्रक्रिया अधिक वेगाने होते आणि तुम्ही जिथे लक्ष द्यायला हवे अशा ठिकाणी लक्ष देऊ शकता.

3.    अनपेक्षित खर्चांच्या तोंडमिळवणीसाठी कर्जाची वाढीव रक्कम वापरा
तुमच्या अर्हतेनुसार बजाज फिनसर्व्हने तुम्हाला देऊ केलेल्या वाढीव कर्जाच्या रकमेवर तुम्ही अवलंबून राहू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार तिचा वापर करू शकता. या रकमेच्या अंतिम वापराच्या संदर्भात कसलेही निर्बंध नाहीत, त्यामुळे तुम्ही रोख रक्कम विविध खर्चांकडे वळवू शकता. ज्या खर्चांचे तुम्ही नियोजन केले नव्हते आणि जे तुमच्या बजेटच्या बाहेर होते, अशाही खर्चांची तोंडमिळवणी करण्यासाठी ही वाढीव कर्जाची मंजुरी उपयोगी पडू शकते. तुम्ही इन्स्टंट पर्सनल लोनमधून मिळणारा निधी वैद्यकीय बिलांपासून घरसुधार खर्चापर्यंत आणि कर्जाचे डोंगर हटवण्यापर्यंत कशासाठीही कोणताही संकोच न करता वापरू शकता.

4.     तारणमुक्त वित्त मिळवा कोणत्याही छुप्या आकारांविना 
या इन्स्टंट पर्सनल लोनसाठी तुम्ही कोणतीही मालमत्ता तारण ठेवण्याची गरज नसल्याने त्यासाठी अर्ज करणे सोपे आणि तणावमुक्त आहे. मालमत्तेचे परीक्षण किंवा वैधता तपासणी करायची नसल्याने कर्जवाटपही वेगाने होते. शिवाय, तुमच्या कर्जाच्या अर्जासंदर्भात किंवा परतफेडीसंदर्भात कोणतेही छुपे शुल्क आकारण्यात येत नसल्याने तुम्ही या कर्जाची परतफेड सुलभतेने करू शकता.

5.    लवचीक कालमर्यादेच्या साह्याने परतफेडीचे सुलभ नियोजन करा 
परतफेडीसाठी 60 महिन्यांपर्यंतची लवचीक कालमर्यादा उपलब्ध असल्यामुळे तुम्ही कर्जाच्या परतफेडीसाठी तुमच्या पाकिटाला सोयीस्कर पडेल अशी आणि हवी ती कालमर्यादा निवडू शकता. तुमचे उत्पन्न आणि इतर खर्च यांची सांगड घालून परतफेड करण्यासाठी फक्त ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करा.

या सगळ्या लाभांमुळे तुम्ही कुठूनही कुठेही म्हणजे तुमच्या घरातल्या कोचावरून किंवा ऑफिसच्या डेस्कवरून इन्स्टंट पर्सनल लोन साठी अर्ज करू शकता आणि फक्त दोन क्लिक्सच्या माध्यमातून ते आताच्या आता तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळवू शकता. कर्जप्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्ही फक्त एवढेच करायचे, तुमचे नाव आणि संपर्क क्रमांक देऊन तुमच्यासाठीची प्रि-अॅप्रूव्ह्ड ऑफर तपासून घ्यायची. तात्काळ पैसे हवे आहेत? तर मिळवा ताबडतोब!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com