देशातील बँका १३ दिवस बंद राहणार; बँंक हॉलिडेची सविस्तर यादी जाणून घ्या

सण, साप्ताहिक सुट्ट्या; ऑनलाईन बँकिंग मात्र सुरू
FD interest get rid of bank related work quickly Banks will closed for 13 days in march online banking
FD interest get rid of bank related work quickly Banks will closed for 13 days in march online bankingsakal

नवी दिल्ली : देशभरातील बँका मार्चमध्ये सणासुदीनिमित्त आणि साप्ताहिक सुट्ट्यांनिमित्त जवळपास १३ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांना मार्चमध्ये आपली बँकिंग संबंधित कामे लवकरात लवकर आटपून घ्यावी लागणार आहेत. तसेच ऑनलाईन बँकिंग प्रणाली मात्र ग्राहकांसाठी खुली राहील.

आरबीआयने या सुट्ट्यांसंबंधित यादी जाहीर केली आहे. असे असले तरी विविध राज्यांत या सुट्ट्या तेथील सणासुदीनुसार असतात. त्यामुळे या सुट्ट्यांमध्ये काही बदलही होऊ शकतात. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रविवारशिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. मार्चमध्ये रविवारच्या चार सुट्ट्या येतात. याशिवाय सात सुट्ट्या त्या त्या राज्यांतील सणासुदींनुसार असणार आहे. महाराष्ट्रातील सणांनुसार १ मार्चला महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रातील अनेक बँका बंद राहतील. १७ मार्चला, याशिवाय होलीनिमित्तही बँका बंद राहतील. महाराष्ट्रात ८ ते ९ दिवस सुट्ट्यांमुळे बँका बंद राहण्याची शक्यता आहे; परंतु ग्राहक ऑनलाईन व्यवहार करू शकणार असल्याने ग्राहकांसाठी ही बाब दिलासादायक आहे.

एफडी व्याजात बदल

बँक ऑफ बडोदाने फिक्स्ड डिपॉझिटवरील (एफडी) व्याजदरात बदल केला आहे. बँकेने २५ फेब्रुवारीपासून एफडीवरील व्याजदर वाढला आहे. आता हा व्याजदर २.८ टक्क्यांपासून ते ५.२५ टक्क्यांपर्यंत असणार आहे. याशिवाय बँकेने बचत खात्यावरील व्याजदरातही बदल केला आहे. हे व्याजदर २५ फेब्रुवारीपासून लागू होतील. २.७५ ते ३.३० टक्क्यांदरम्यान हे व्याजदर असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com