99 रुपयांत 'गो एअर'मध्ये मिळवा हवी ती सीट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

मुंबई : नागरी विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने विस्तार करणाऱ्या 'गो-एअर'ने सीट्सच्या पूर्वनोंदणी तथा प्री-बुकिंगची सुविधा 99 रुपयांत उपलब्ध केली आहे. या सुविधेसाठीची ही सर्वांत नीचांकी किंमत आहे. प्रवाशांना त्यांना हव्या त्या सीटची निवड करून कमीत कमी दरात आरामदायी प्रवास करणे शक्य होणार आहे. इकॉनॉमी, बिझनेस अशा कोणत्याही प्रकारातील हा सर्वांत कमी दर ठरला आहे.
 
परवडणाऱ्या दरात सीट सिलेक्शनची सुविधा यामुळे उपलब्ध झाली आहे. या सुविधेद्वारे 99 रुपयांपासून प्रवासी त्यांना हव्या त्या रांगेतील सीटची निवड करू शकतात. या ऑफरमुळे प्रवाशांना त्यांच्या आवडीच्या सीटची निवड करणे शक्य होणार आहे. गो-एअरने आपल्या ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य देताना आरामदायक आणि परवडणाऱ्या दरात हवाई सफर करता याची दक्षता घेतली आहे. ग्राहक या योजनेचा लाभ www.goair.com द्वारे घेऊ शकतात.
 
‘फ्लाय स्मार्ट’ या आपल्या थीमनुसार इकोनॉमी आणि बिझनेस अशा दोन्ही प्रकारांमध्ये गो-एअर विविध सेवा देत आहे. अहमदाबाद, बगडोरा, बंगळूरू. भुवनेश्वर, चंडीगड. चेन्नई, दिल्ली, गोवा, जयपूर, कोची, कोलकत्ता, लेह, लखनऊ, मुंबई, नागपूर, पटना, पोर्ट ब्लेअर, पुणे, रांची, श्रीनगर आणि हैदराबाद या ठिकाणी गो-एअर आपली सेवा देत आहे. 
 
Web Title: GoAir launches seat selection at Rs 99 onwards