Gold Sliver Rate : सोने-चांदी महागलं, जाणून घ्या आजचा दर

india gold
india gold

जागतिक बाजारामध्ये किंमती वाढल्यामुळे शुक्रवारी भारतीय बाजारामध्ये सोने-चांदीचे दर वाढले आहेत, मल्टिकॉमोडीटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा दर पुन्हा ५२ हजाराच्या पार गेला आहे. सकाळी 9.10 वाजता, MCX वर 24 कॅरेट सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 308 रुपये वाढून प्रति 10 ग्रॅमसाठी 57,075 रुपये झाली. एक्स्चेंजमध्ये व्यवहाराच्या सुरुवातीला सोने 51,702 रुपयांवर सुरूवात झाली होती यानंतर सतत मागणी वाढल्याने पिवळ्या धातूची किंमत वाढली आणि काही मिनिटांतच त्याची किंमत 52,000 रुपये झाली.

चांदीचा भाव देखील वाढला

MCXवर सकाळी चांदीने मोठ्या उसळीसह 69,663 रुपये प्रति किलोवर सुरूवात केली. पण, जसजसा व्यापार वाढत गेला तसतसे गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात विक्री नफा मिळवण्यास सुरुवात केली. असे असतानाही चांदीचा भाव 130 रुपयांनी वाढून 69,450 रुपये किलो झाला.

india gold
Share Market: शेअर बाजारात अंशत: वाढ; सेन्सेक्स 206 आणि निफ्टी 66 अंकांनी वधारलं

जागतिक बाजारपेठेतही सुधारणा होण्याची चिन्हे

रशिया-युक्रेन संकटादरम्यान क्रूड आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदारही सोने आणि चांदीची खरेदी करत आहेत. जागतिक बाजारात सोन्याचा भाव 0.22 टक्क्यांनी वाढून 1,962.85 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीही 0.16 टक्क्यांनी वाढून 25.96 डॉलर प्रति औंस झाली.

म्हणून वाढल्या सोन्या-चांदीच्या किंमती

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारात चढ-उतार होत असून त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला आहे. सुरक्षित परताव्याच्या शोधात गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे वळत आहेत, ज्यामुळे मागणी पुन्हा वाढली आहे. दुसरीकडे, कोरोनापासून दिलासा मिळाल्यानंतर औद्योगिक कामांना पुन्हा गती मिळू लागली असून, त्यामुळे चांदीची मागणीही वाढू लागली असून भावही वाढू लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com