आठ ऑगस्ट रोजी सोन्याचा दर ५६ हजार ५०० रुपये दहा ग्रॅमवर पोहोचला होता. तर चांदीचा भाव ६८ हजार रुपये किलोग्रॅम इतका झाला होता. सध्या सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. एक किलो चांदी ६३ हजार रुपये झाली आहे. तीन दिवसांपासून हे भाव स्थिरावलेले आहेत.
नागपूर : सोन्याचा भाव ५० हजारांच्या खाली आला आहे. आज शंभर रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा दर ४९,६०० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे.
कोरोना लशींच्या चाचण्या एकामागून एक यशस्वी होत आहेत. त्यांचे वितरण कशा रीतीने होते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. मात्र, किमान चार कंपन्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लशींबाबत दावे केले आहेत. त्यामुळे भांडवली बाजारात तेजीची लाट आली आहे. त्यातच अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडन हे आर्थिक पॅकेजबाबत काय भूमिका घेतात याचीदेखील गुंतवणूकदारांना उत्सुकता लागली आहे.
आठ ऑगस्ट रोजी सोन्याचा दर ५६ हजार ५०० रुपये दहा ग्रॅमवर पोहोचला होता. तर चांदीचा भाव ६८ हजार रुपये किलोग्रॅम इतका झाला होता. सध्या सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. एक किलो चांदी ६३ हजार रुपये झाली आहे. तीन दिवसांपासून हे भाव स्थिरावलेले आहेत.
हेही वाचा - अंकिता जळीतकांड : पहिल्याच दिवशी आरोपीचे वकील गैरहजर; गुरुवारी देतील आरोपावर उत्तर
सोने पाच हजार रुपयांनी वधारेल
कोरोना लशीची चाचणी यशस्वी झाल्याच्या वृत्ताने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहे. सध्या सोन्याच्या दरात अस्थिरतेचे वातावरण राहण्याचे संकेत आहे. दर आणखी कमी होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, युरोपमध्ये टाळेबंदी वाढल्यास गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळतील आणि सोने पाच हजार रुपयांनी वधारेल अशी शक्यता आहे.
- राजेश रोकडे,
संचालक, रोकडे ज्वेलर्स
संपादन - नीलेश डाखोरे