‘कठीण समय येता...’

गौरव मुठे
सोमवार, 29 जुलै 2019

‘सकाळ मनी’कडून खास सोय
कोणत्याही प्रकारच्या कर्जापेक्षा सोने तारण कर्ज किंवा ‘गोल्ड लोन’ घेणे निश्‍चितच सोईस्कर आहे आणि त्याची सोय ‘सकाळ मनी’ने सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ७४४७४५००५४ या दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा, त्यानंतर संबंधितांशी स्वतंत्रपणे संपर्क साधला जाणार आहे.

प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार, कधी ना कधी सोने खरेदी करीतच असतो. मात्र, अडचणीच्या वेळी आपल्याकडे असलेले सोने त्या अडचणीतून मार्ग काढून देऊ शकेल, हे आपण विसरतो. सोन्याविषयी असलेल्या भावनिक गुंतवणुकीमुळे अडीअडचणीच्या वेळी आपण लगेच सोने विकायला जात नाही. एका बाजूला पैशांची गरज असते आणि दुसरीकडे सोने विकायला मन धजावत नसते, अशी विचित्र अवस्था होते. पण, यातूनच ‘सोने तारण कर्ज’ किंवा ‘गोल्ड लोन’ हा मध्यममार्गी उपाय उपयोगी ठरू शकतो. आता अल्पकाळासाठी तुम्हाला कर्ज हवे असेल किंवा अगदी लवकरात लवकर कर्ज हवे असेल, तर ‘सकाळ मनी’च्या माध्यमातून ‘गोल्ड लोन’देखील घेता येणार आहे. यासाठी ‘सकाळ मनी’ने आघाडीच्या बॅंकांशी ‘टाय-अप’ केले असून, त्यांच्या माध्यमातून हे कर्ज सुलभ रीतीने, आकर्षक दराने आणि त्वरित उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

कसे मिळवाल गोल्ड लोन?
‘इन्स्टंट गोल्ड लोन’द्वारे तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर १० हजार ते १५ लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. शिवाय, तुमच्याकडे २४ कॅरेट सोन्याचे ‘बॅंक कॉइन’ असेल, तर त्यावरदेखील कर्ज मिळू शकते. मात्र, असे ५० ग्रॅमपर्यंतचेच सोने तुम्ही तारण ठेवू शकता. तुमचे सोने वा दागिने बॅंकेकडे अगदी सुरक्षित स्वरूपात ठेवले जातात. त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नसते. संबंधित बॅंकेच्या मान्यताप्राप्त सराफाकडून सोन्याचे वा दागिन्यांचे मूल्य (व्हॅल्युएशन) काढले जाते आणि कमीत कमी सहा महिन्यांपासून जास्तीत जास्त बारा महिन्यांसाठी हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज रोख स्वरूपातदेखील मिळू शकते. मात्र, त्यापेक्षा अधिक रकमेचे कर्ज असेल, तर ते ‘एनईएफटी’ किंवा ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून देण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे सोने तारण कर्ज मुदतीच्या आधी फेडले, तर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. 

‘गोल्ड लोन’मध्ये सोने तारण ठेवून घेतलेल्या कर्जावर दर महिन्याला हप्ता भरण्याचे टेन्शन नसते. तशी सुविधा काही बॅंकांनी दिली आहे. कर्जाचा कालावधी जेव्हा संपतो, त्या वेळी व्याज द्यावे लागते. शिवाय, १८ वर्षांवरील कोणीही व्यक्ती स्वत:च्या मालकीचे असणारे सोने अशा पद्धतीने तारण ठेवून कर्ज घेऊ शकते. थेट ७० वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांनादेखील ‘गोल्ड लोन’चा फायदा घेता येतो. यासाठी कोणत्याही उत्पन्नाचा दाखला, सिबिल स्कोअर किंवा नोकरदार असाल तर सॅलरी स्लिप देण्याचीदेखील गरज नसते. 

स्टॅंडअलोन गोल्ड लोन
शेतकऱ्यांना आता ‘स्टॅंडअलोन गोल्ड लोन’ मिळू शकेल. ज्यांच्याकडे सातबारा (७/१२) असेल किंवा नसेल अशा शेतकऱ्यांनाही कर्ज मिळू शकते. शेतकऱ्याकडे सातबारा असल्यास कमी व्याजदराने कर्ज मिळते. बारा महिने मुदतीचे कर्ज घेतल्यास सोन्याच्या मूल्याच्या ७५ टक्‍क्‍यांपर्यंत किंवा सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज घेतल्यास सोन्याच्या मूल्याच्या ७० टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज दिले जाते. मात्र, यासाठी सोने किमान १८ कॅरेटचे असायला हवे. सोन्यावर बॅंकेकडून विमासंरक्षण घेतले जाते, त्यामुळे तुमचे सोने सुरक्षित राहते. त्याला काही धोका पोचल्यास बॅंक तुमच्या सोन्याच्या मूल्याइतके पैसे तुम्हाला परत करते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कर्ज घेण्यासाठी कोणत्याही भौगोलिक मर्यादा नाहीत. म्हणजेच, कोल्हापूरचा माणूस पुण्यातूनदेखील कर्ज घेऊ शकतो, हे विशेष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Loan Sakal Money