esakal | सोने खरेदी करण्याचा 'गोल्डन चांन्स' ! सोन्याचा आज काय आहे भाव, जाणून घ्या    
sakal

बोलून बातमी शोधा

gold

आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील चढउतारामुळे सोन्याचे दरात कमालीची घसरण झाली असून आठ महिन्यात वाढलेले सोन्याचे भाव आठ दिवसात कमी झाले आहे.

सोने खरेदी करण्याचा 'गोल्डन चांन्स' ! सोन्याचा आज काय आहे भाव, जाणून घ्या    

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः संपूर्ण जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवीला असून अनेक आर्थिक संपन्न देश आर्थिक संकटाशी त्यांना आता लढावे लागत आहे. त्यामुळे जागतीक सुवर्ण बाजारपेठवर देखील याचा मोठा परिणाम पडून सोन्याचे भाव वधारले होते. भारतात देखील सोन्याचे दर सुमारे आठ ते दहा हजार रुपयांनी
रुपयांनी वाढले होते. त्यामुळे सोन्याचे दर ५८ हजार रुपये तोळे असे झाले होते. तर चांदी ७० हजाराच्या आसपास झाली होती. पंरतू कोरोना व्हॅक्सीन आल्यानंतर तसेच आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील चढउतारामुळे सोन्याचे दरात कमालीची घसरण झाली असून आठ महिन्यात वाढलेले सोन्याचे भाव आठ दिवसात कमी झाले आहे. जळगाव सुर्वण बजाारात आज सोन्याचे (जीएसट) दर ४५ हजार 6०० रुपये झाले तर चांदीचा भाव ६८ हजार रुपये किलो होता.

कोरोना महामारीमुळे सर्वच व्यवसायावर परिणाम झाल्याने सुवर्ण बाजारात देखील याचा परिणाम झाला होता. त्यामुळे सोने व चांदीचे भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. सोने ३० हजारापासून जवळपास ५८ हजार रुपये तोळे सोने गेले होते. तर चांदी ७२ हजार प्रति किलो हजार रुपये झालेली होती. त्यामुळे सुवर्ण व्यवसायार याचा मोठा परिणाम पडला होता. आता कोरोनावर व्हॅक्सीन आली असून त्यात आंतराष्ट्रीय बाजारपेठेत झालेली चढउतार तसेच डाॅलरच्या भावात होत असलेली घसरणीमुळे गेल्या आठ दिवसापासून सोने चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. येत्या काळात सोने व चांदीच्या भावात अजून घसरण होण्याचा अंदाज सुवर्ण व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे. 

सट्टेबाजारामूळे सोने तेजीत
सोने बाजारात सट्टेबाजार तेजीत असून तेजीच्या काळात सट्टेबाजारांनी सोने विक्री केली. अजून ही सोने विक्री व खरेदी करणे तेजीत असल्याने याचा परिणाम सुवर्ण बाजारावर पडलेला आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात चढ उतार पाहण्यास मिळत आहे.

कोरोना व्हॅक्सीनमूळे परिणाम
कोरोना महामारीवर कोरोना व्हक्सीन आल्याने बाजारपेठेत देखील तेजी आली आहे. त्यामुळे पून्हा मार्केट मध्ये तेजी आली असल्याने देखील सोने-चांदीच्या बारपेठेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सोने व चांदीचे भाव कमी झाला आहे. 

आठ दिवसात मोठी घरसरण 
चांदी पेक्षा सोन्याच्या भावात मोठी घसरण झालेली आहे. गेल्या आठ दिवसात अडीच हजारावर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २५, २६ फेब्रुवारीला ४७ हजार,  २७ फेब्रुवारीला ४६ हजार ६०० रुपये, २८ फेब्रुवारी ४६ हजार ७००, १ मार्च ४६ हजार ८००, २ व ३ मार्च ४५ हजार ८००, तर आज ४५ हजार ५०० रुपये असे सोन्याचे दर झाल आहे. चांदीचे देखील दोन तिन महिन्यात अडीच हजार रुपये भाव उतरले असून आज चांदीचे 68 हजार रुपये प्रति किलो आहे. 
 
तीन महिन्यात पाच हजाराने घट
सुवर्ण बाजारात गेल्या तीन महिन्यापासून चढ उतार होत असून जानेवारी महिन्याच्या सुरवातीला ५२ हजार रुपये तर महिन्याभराच्या सुवर्ण बाजार चढउतारीमूळे पन्नास हजारा रुपये भाव उतरले होते. तर फेब्रुवारीत ५० हजार ते ४८ हजार रुपये प्रति तोळे सोन्याचा दर होता. जानेवारीत ५० ते ५२ हजार रुपये, फेब्रुवारीत ५० हजारापासून ते ४८ हजारा पर्यंत तर मार्च महिन्यात ४८ हजारापासून सोन्याच्या भाव कमी होण्यास सुरवात झाली.  


आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत डाॅलरचे भावात चढ उतार, तसेच सोने विक्री सट्टेबाजार तसेच कोव्हिड वॅक्सिन बाजारात आल्याने बाजारपेठेत मोठे उलथापालथ झाली आहे. याचा सुवर्ण बाजारावर परिणाम झाला असून सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोने गुतंवणीकीची सुर्वण संधी आहे. 
- सुवर्णकूमार लुंकड, सचिव, जळगाव जिल्हा सराफ असोसिएशन.

loading image
go to top