esakal | सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीही महागली
sakal

बोलून बातमी शोधा

gold_143.jpg

मागील काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसतेय.

सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीही महागली

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- मागील काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसतेय. सोन्याच्या दराने त्याचा आतापर्यंतचा उच्चांकी दर 56 हजार 200 रुपये पर्यंत मजल मारल्यानंतर सोने उतरले होते. सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. मागील सत्रात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.  एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) गोल्ड फ्यूचरच्या मते सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी वाढून 51 हजार 532 रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीचे दर 0.6 टक्क्यांनी वाढून 68 हजार 350 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. गेल्या सत्रात सोने 1 टक्क्यांनी किंवा 500 रुपयांनी कमी झालं होतं तर चांदीचा दर 1.5 टक्क्यांनी किंवा 1,050 रुपये प्रतिकिलोने कमी झालं होतं. गेल्या महिन्यात सोन्याचे दराने विक्रमी किंमत गाठली होती. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56 हजार 200 रुपये पर्यंत गेले होते. पण आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅमला 5 हजारांनी उतरले आहे.

 टिकटॉकच्या खरेदीसाठी भिडू मिळाला; कारभार नव्या कंपनीच्या हाती

परदेशी बाजारात सोन्याचा भाव-
 
जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर आज स्थिर दिसून आले. तिथं सोन्याचे दर प्रति औंस 1941.11 डॉलर होते. त्याच वेळी, इतर मौल्यवान धातू, चांदीचे दर कमी झाल्याचे दिसून आले. चांदीचे दर 0.3 टक्क्यांनी घसरून 26.68 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आर्थिक धोरणांच्या निर्णयापूर्वी या शनिवार व रविवारच्या आधी सोन्यात गुंतवणुक करणारे गुंतवणूकदार सावध दिसले. आता 15 ते 16 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या दोन दिवसीय धोरण बैठकीवर सोन्याच्या व्यापाऱ्यांचं लक्ष असेल. कारण अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या धोरणांचा परिणाम आंतरराष्ट्रीय कमॅाडिटी मार्केटवर दिसून येतो.

 सोन्याचे दर 30 टक्क्यांनी वाढले-

यावर्षी सोन्याचे दर पाहिले तर, अलिकडच्या काळात काही प्रमाणात दरात घसरण झाली असली तरी आतापर्यंत ही सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फ्यूचर मार्केटच्या मते सध्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 51,000 रुपये आहे.  तथापि, गेल्या महिन्यात ते प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांपर्यंत पोहोचले होते