ब्रेकिंग : सोने-चांदीच्या भावात पुन्हा मोठी घसरण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

सोने आणि चांदीच्या किंमती गगनाला भिडत असताना आज (ता.11) बुधवारी सोन्याची किंमत बुधवारी 0.26 टक्क्यांनी घसरली असून सोने तब्बल दहा ग्रॅमला 1730 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्यात सोनं 39278 रूपयांवर गेलं होतं. सोन्याचा आजचा भाव घसरून 38154 रुपये झाला आहे.

मुंबई : सोने आणि चांदीच्या किंमती गगनाला भिडत असताना आज (ता.11) बुधवारी सोन्याची किंमत बुधवारी 0.26 टक्क्यांनी घसरली असून सोने तब्बल दहा ग्रॅमला 1730 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्यात सोनं 39278 रूपयांवर गेलं होतं. सोन्याचा आजचा भाव घसरून 38154 रुपये झाला आहे.

सोन्याप्रमाणे चांदीचे दरही मोठ्या प्रमाणावर घसरले असून, चांदीच्या किमतीत 0.23 टक्क्यांनी घसरण झाली असून चांदीच्या दरात प्रतिकिलो एकूण 3800 रूपयांची घट झाली आहे. बुधवारी चांदीची किंमत प्रतिकिलो 47686 रूपये एवढी खाली आली आहे. गेल्या आठवड्यात चांदीची किंमत प्रतिकिलो 51489 रुपये एवढी होती. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1550 डॉलर प्रति औंस होतं. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1491 डॉलर प्रति औंस झाले आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल 24 टक्क्यांनी तर चांदीच्या दरात 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमागील एक कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेलं व्यापार युद्ध असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचं सावटही एक कारण असू शकते. एकूणच आंतराराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीत या आठवड्यात घट झालेली पाहायला मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices today down Rs. 1700 from highs silver rates fall further