esakal | सोने पुन्हा तेजीत 
sakal

बोलून बातमी शोधा

gold

जागतिक पातळीवर वाढलेले भाव आणि रुपयातील घसरण यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव मंगळवारी वधारला. दिल्लीत सोन्याचा भाव 239 रुपये आणि चांदीचा भाव 296 रुपयांनी वाढला. 

सोने पुन्हा तेजीत 

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - जागतिक पातळीवर वाढलेले भाव आणि रुपयातील घसरण यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव मंगळवारी वधारला. दिल्लीत सोन्याचा भाव 239 रुपये आणि चांदीचा भाव 296 रुपयांनी वाढला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऍपल कंपनीने मार्चअखेर संपणाऱ्या तिमाहीत महसुली उद्दिष्ट गाठणे शक्‍य नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात जोखीम घेणे टाळले. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे मोर्चा वळविला. याचाच परिणाम होऊन आज सोन्याच्या भावात तेजी दिसून आली. सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 588 डॉलरवर गेला. चांदीचा भाव प्रतिऔंस 17.88 डॉलरवर गेल्याची माहिती एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे वरिष्ठ विश्‍लेषक तपन पटेल यांनी दिली. 

जागतिक पातळीवर भावात आलेली तेजी आणि डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याची झळाळी आज वाढली. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 239 रुपयांची वाढून 41 हजार 865 रुपयांवर गेला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 296 रुपयांनी वधारून 47 हजार 584 रुपयांवर पोचला. 

मुंबईतही भाव तेजीत 
मुंबईतील सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 270 रुपयांनी वधारून 41 हजार 135 रुपयांवर गेला. स्टॅंडर्ड सोन्याचा भावही 269 रुपयांची वाढ होऊन 40 हजार 970 रुपयांवर गेला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 380 रुपयांनी वाढून 46 हजार 454 रुपयांवर पोचला.