सोने स्वस्त झाले हो; 10 ग्रॅमचा दर आहे... 

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 जुलै 2019

दिल्लीत भाव सहाशे रुपयांनी घसरला 
नवी दिल्ली ः जागतिक पातळीवर वधारलेला डॉलर आणि स्थानिक पातळीवर सराफांकडून कमी झालेली मागणी यामुळे मंगळवारी सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 600 रुपयांनी घसरला. 

दिल्लीत शुद्ध सोन्याचा भाव आज प्रतिदहा ग्रॅमला 600 रुपयांची घसरण होऊन 34 हजार 870 रुपयांवर आला. याचवेळी स्टॅंडर्ड सोन्याचा भाव तेवढीच घसरण होऊन 34 हजार 700 रुपयांवर आला. चांदीच्या भावात प्रतिकिलोला 48 रुपये घसरण होऊन तो 38 हजार 900 रुपयांवर आला. 

मुंबईत शुद्ध सोन्याचा भाव आज प्रतिदहा ग्रॅमला 387 रुपयांची घसरण होऊन 34 हजार 228 रुपयांवर आला. याचवेळी स्टॅंडर्ड सोन्याचा भाव 385 रुपयांची घट होऊन 34 हजार 91 रुपयांवर आला. चांदीचा भाव प्रतिकिलोला 120 रुपयांची घसरण होऊन 37 हजार 505 रुपयांवर आला. 

सीमा शुल्क वाढीचा परिणाम 
जागतिक पातळीवर सोन्याचा भाव आज प्रतिऔंस 1 हजार 394 डॉलरवर घसरला, तर चांदीचा भाव प्रतिऔंस 15.08 डॉलरवर आला. डॉलर वधारल्यामुळे सोन्याला आज फटका बसला. याचबरोबर मोठा आयातदार देश असलेल्या भारताकडून सोन्याची मागणी कमी झाली आहे. सोन्यावरील सीमाशुल्क 10 टक्‍क्‍यांवरून 12.5 टक्के करण्यात आल्याचा हा परिणाम आहे. यामुळे सोन्याच्या भावात जागतिक पातळीवर घट झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Rate Today: Gold lacklustre on weak global cues