सोन्याची चकाकी पुन्हा वाढतेय; कारण... 

वृत्तसंस्था
Monday, 27 January 2020

सोमवारी स्पॉट गोल्ड वर सोन्याच्या भावात 10.90 टक्क्यांनी वाढ होऊन सोने प्रति आऊन्स 1,581.64 डॉलर्सवर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय स्पॉट गोल्ड मध्ये वाढ झाल्याने आणि रुपया घसरल्याने फिजिकल गोल्डमध्ये वाढ होऊन दिल्लीमध्ये सोने 41,600 प्रति दहा ग्रॅमवर पोचले आहे.

नवी दिल्ली : राजकीय, आर्थिक आणि सामाजिक अस्थैर्यावेळी गुंतवणुकीसाठी 'सेफ हेवन' समजल्या जाणाऱ्या सोन्याचे भाव आज चांगलेच वधारले आहेत. आजच्या भाव वाढीसाठी आरोग्याचे कारण निमित्त झाले आहे. चीनमधून प्रसारित झालेला कोरोना विषाणू जगभरात झपाट्याने पसरत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचा दुसरा रुग्ण आढळून आल्याने शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळविला आहे.

सोमवारी स्पॉट गोल्ड वर सोन्याच्या भावात 10.90 टक्क्यांनी वाढ होऊन सोने प्रति आऊन्स 1,581.64 डॉलर्सवर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय स्पॉट गोल्ड मध्ये वाढ झाल्याने आणि रुपया घसरल्याने फिजिकल गोल्डमध्ये वाढ होऊन दिल्लीमध्ये सोने 41,600 प्रति दहा ग्रॅमवर पोचले आहे. तर वायदेबाजारात फेब्रुवारी वायदा पूर्ती सेगमेंटमध्ये सोने 267 रुपयांनी वाढून 40,619 प्रति दहा ग्रॅमवर व्यवहार करत आहे.

दरम्यान कोरोना विषाणू झपाट्याने पसरत असून त्याचा वेग पाहता तो आणखी वेगाने पसरण्याची शक्यता चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने व्यक्त केली आहे. आतापर्यंत जगभरात  2,700 नागरिक कोरोना विषाणूने प्रभावित झाले असून यामुळे दगावलेल्यांची संख्या 80 वर गेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold rates hike again because of Corena virus