Check Today's Gold Silver Price Updates | सोने-चांदीच्या किमतीत किरकोळ वाढ! जाणून घ्या नवे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Check Today's Gold  Price Updates

सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

सोने-चांदीच्या किमतीत किरकोळ वाढ! जाणून घ्या नवे दर

जर तुम्हीही सोनं (Gold) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. लग्नसराईत सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात (Gold Price) किरकोळ वाढ झालीय. (Check Today's Gold Silver Price Updates)

हेही वाचा: सोने-चांदीचे नवे दर जारी! एक तोळे सोन्याची किंमत जाणून घ्या?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये (Mumbai) 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,300 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,510 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात (Pune) प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,200 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,400 रुपये असेल. नागपूर(Nagpur) मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,200 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,400 रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 638 रुपये आहे.

अशा प्रकारे जाणून घ्या सोन्याची शुद्धता

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

हेही वाचा: सोने-चांदी महागले, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ

मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे सोन्याची नवीन किंमत (Latest price of gold) जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर (Retail rates) जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासह, वारंवार अपडेट्सबद्दल माहितीसाठी तुम्ही www.Ibja.Co ला भेट देऊ शकता.