esakal | सोन्याच्या किंमतीतील चढ-उतार, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक? वाचा संभाव्य परिणाम 
sakal

बोलून बातमी शोधा

gold-silver

आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात  बंद असल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता,  ज्यामुळे सोन्याच्या किंमती मोठया प्रमाणात वधारल्या होत्या. पण आता अचानक सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून येत आहेत.

सोन्याच्या किंमतीतील चढ-उतार, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक? वाचा संभाव्य परिणाम 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगात सगळीकडे लॉकडाउन असल्यामुळं अर्थचक्र बंद( economy collapse) पडलं आहे. जगातील जवळपास सर्व देशांचा GDP(Gross Domestic production)कमी झाला असून काहींचा देशांचा GDP तर शून्याच्याही खाली सरकरला आहे. भारतातही लॉकडाउनचा परिणाम मोठा झाला असून याकाळात जवळपास 2 कोटी लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या(increased unemployment rate) लागल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या बेरोजगारीमुळे भारतातील सर्व आर्थिक व्यहवार बंद पडले आहेत.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिवसातली आजवरची सर्वांत मोठी घसरण
दरम्यान, याकाळात सोने आणि चांदीच्या किमतींनी मोठी भरारी घेतली होती.  याकाळात सोन्याची किंमत जवळपास 20 हजारांनी वाढली होती. आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात  बंद असल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता,  ज्यामुळे सोन्याच्या किंमती मोठया प्रमाणात वधारल्या होत्या. पण आता अचानक सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून येत आहेत. सोन्याची आतरराष्ट्रीय किंमतीत काल 5.7 टक्क्याने उतरल्या होत्या आणि लगेच 1.3 टक्क्याने वाढल्याही. महत्वाचे म्हणजे गेल्या 7 वर्षांतील सोन्याची ही एका दिवसातील सगळ्यांत मोठी किंमत घट होती. 

भविष्यात मोठा धोका
दुसरीकडे भारतातील ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार आणि RBI(Reserve Bank of India)चे प्रयत्न सुरू आहेत. भारतात सध्या कोट्यवधी तरुण बेरोजगार, ठप्प पडलेलं सेवा क्षेत्र, हजारो उत्पादन कंपन्या बंद आहेत. सध्या देशात कोरोनाचा फैलावही मोठया प्रमाणात वाढतच आहे. यामुळे देशाची विस्कटलेली आर्थिक स्थिती पुढील बरेच दिवस पूर्वपदावर येण्याची लक्षणे दिसत नाहीत. बाजारात पैसा खेळता राहण्यासाठी RBIची मान्यता असणाऱ्या बॅंकांनी सोन्यावर 90 टक्के कर्ज देणं सुरू केलं आहे, यापूर्वी 75 टक्के कर्ज दिलं जायचं. हे RBIने आर्थिक सुधारणेसाठी घेतलेलं पाऊल भविष्यात खूप धोकादायक ठरू शकतं, असं तज्ञांचं मत आहे. कारण  सोन्याची आंतरराष्ट्रीय किंमत 5.7 टक्क्याने उतरून आणि लगेच 1.3 टक्क्याने वाढल्याही. इतक्या मोठया प्रमाणात  सोन्याच्या किंमतीत चढउतार आणि अस्थिरता असेल तर बॅंकांनी सोन्यावर 90 टक्के कर्ज देणं खूपच महागात पडू शकतं. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

RBI आशावादी
RBIला  या धोरणामुळे सोन्याच्या बदल्यात पैसा बाजारात जाऊन अर्थव्यवहार वाढून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे. पण, सोन्याच्या किंमतीतील ही चढउतार आणि अस्थिरता पाहिली तर भविष्यात बॅंकांनी दिलेल्या कर्जापेक्षा सोने स्वस्त झाले तर बॅंकांना मोठा तोटा होऊ शकतो. अधिच बिघडलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेला हा प्रयत्न उलटू शकतो, असं तज्ञांनी सांगितलं आहे.