सोने- चांदी स्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold silver rate

सोने- चांदी स्वस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाल्याने सोने-चांदीचे भाव वाढतील असे बोलले जात होते. मात्र, गेल्या आठ दिवसात सोने प्रति दहा ग्रॅम १,९०० रुपये तर चांदी प्रति किलो ४,५०० रुपयांनी घसरली आहे. आज सोने प्रति दहा ग्रॅम ४८ हजार आहे तर चांदी प्रति किलो ६३ हजार ५०० रुपयावर आली आहे.

१६ नोव्हेंबर रोजी सोने प्रति दहा ग्रॅम ४९ हजार ९०० रुपये तर चांदी प्रति किलो ६८ हजार रुपये होती. त्यात आता हळू हळू घसरण होऊ लागली आहे. सोने कमी होण्याचे नेमके कारण सांगणे कठीण असल्याचे व्यापारी सांगत आहे. मात्र, अमेरिकेच्या मध्यवर्ती फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी ठेवले आहेत. त्याचा सोन्याच्या दरावर परिणाम पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लग्नसराईसाठी सोने-चांदीच्या खरेदीला वेग आला आहे. गेल्या दहा दिवसात मात्र, सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांचे चेहरे फुलले आहे. अनेकांनी सोने खरेदीवर भर दिला आहे.

लग्नसराईसाठी सोन्याची खरेदी जोमाने सुरु झालेली आहे. तसेही दिवाळीनंतर सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची परंपरा आहे. सोन्याच्या दर कमी झाल्याने सोने खरेदीची चांगली संधी आहे. भविष्यात सोने प्रति दहा ग्रॅम सोने ६५ हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे.

राजेश रोकडे, संचालक रोकडे ज्वेलर्स.

loading image
go to top