esakal | स्मार्ट टिप्स : ‘८०:२०’चा नियम काय सांगतो?
sakal

बोलून बातमी शोधा

Smart Tips

स्मार्ट टिप्स : ‘८०:२०’चा नियम काय सांगतो?

sakal_logo
By
गोपाळ गलगली

मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) हे दोघे कुटुंबप्रमुख. आतापर्यंत थोड्याथोडक्या नव्हे, तर जवळजवळ सहा-साडेसहा हजार सदस्यांना त्यांनी आपल्या कुटुंबात सहभागी करून घेतले आहे. सर्वच सदस्य आयुष्यमान ठरले नसतील. काही जन्मताच गेले असतील, काही आजारपणात कुंथत पडले असतील, तर काही अगदी मोजकेच ‘कीर्तिवान’ ठरले असतील. या गोतावळ्यातून हुशार सदस्य निवडायचे कसे, असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावत असतो. अनेक आडाखे बांधले जातात, परीक्षा घेतली जाते. शेअररुपी कोणते सदस्य गुंतवणूकदाराला चांगला परतावा देतील, यावर बरीच चर्चा होत असते. मात्र, चांगल्या शेअरची निवड कशी करावी, हा प्रश्न कायमच पडत असतो.

परंतु, प्रत्येक प्रश्नाला केव्ह़ा ना केव्हा तरी, काही प्रमाणात उत्तर सापडत असते आणि गुंतवणूकदार सुखावत असतो. आता वरच्या प्रश्नाचे उत्तर आहे- ‘८०:२०’चा नियम. हा नियम सर्वत्र लागू पडतो. उदा: कोणत्याही देशातील २० टक्के लोक अतिश्रीमंत असतात किंवा २० टक्के लोकच प्राप्तिकर भरत असतात किंवा २० टक्के गुंडांना पकडून ८० टक्के गुन्हे कमी करण्याचा प्रयत्न सरकार करीत असते आदी.

काय आहे हा नियम?

‘८०:२०’ हा नियम हा शेअर बाजाराला चपखल लागू होतो. या पद्धतीने सहा-साडेसहा हजार शेअररूपी जंगलामधून चंदनासारखी मौल्यवान झाडेरूपी शेअर शोधता येतात. ती पद्धत आहे- ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ पद्धत. म्हणजे शेअर बाजारामध्ये खरेदी-विक्रीसाठी असलेले शेअर (फ्री फ्लोट) गुणिले त्या शेअरचे बाजारी मूल्य. ज्या कंपनीचे ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ जास्त, ती कंपनी उत्तम. या पद्धतीने ‘बीएसई’ने ३० शेअर निवडले आहेत. त्याच्या समूहाला ‘सेन्सेक्स’ नाव आहे. ‘एनएसई’ने या पद्धतीने ५० शेअर निवडले आहेत. त्याचे नाव ‘निफ्टी’. अशा रितीने सहा-साडेसहा हजार झाडांच्या जंगलातून फक्त ५० चंदनाची झाडे निवडून काढली आहेत, जी या बागेची निगा राखत असतात. पण ‘सेन्सेक्स’ची ३० आणि ‘निफ्टी’ची ५० झाडेसुद्धा सांभाळताना कठीण होऊन बसते. अशावेळी मनात असा प्रश्न उभा राहतो, की ‘८०:२०’ किंवा ‘२०:८०’ नियम येथेही नक्की वापरता येऊ शकेल का?

याचा अर्थ पहिले नऊ शेअर बाजाराला ६४.४० टक्के हलवत होते. मग गुंतवणूकदारांनी या शेअरमधे का लक्ष देऊ नये? कारण हे सर्व शेअर उत्तम आहेत आणि साधारणपणे रोज हे शेअर खाली-वर होत असतात. म्हणून ‘८०:२०’ किंवा ‘२०:८०’ नियम सर्वांना भावणारा आहे. ज्यांना लार्ज कॅप म्हणजे मोठ्या कंपन्या सोडून इतर कंपन्यांच्या शेअरविषयी फारसे काही माहिती नसते, त्यांनी किमान अशा शेअरकडे लक्ष दिले तरी पुरेसे ठरू शकते.

‘सेन्सेक्स’प्रमाणे ‘निफ्टी’देखील हेच शेअर निवडून देईल. ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ बाहेरील काही कंपन्यांचे शेअर हे या दोन्ही निर्देशांकांत समाविष्ट असलेल्या शेअरपेक्षा उत्तम काम करीत असतात. अशा शेअरना देखील वरील पद्धतीने शोधता येईल. तसे केल्यास आपला पोर्टफोलिओ तेजीच्या मोठ्या लाटेवर स्वार झालेला दिसेल!

किती शेअर निवडावेत?

या नियमाचा उपयोग करून आपल्याला सहा-साडेसहा हजार शेअरमधून फक्त १०-१२ शेअर निवडता येऊ शकतात, जे बाजाराची ६०-७० टक्के दिशा ठरवतात. सूज्ञ गुंतवणूकदार या १०-१२ शेअरच्या पलिकडे जाणार नाही. ही सर्व ‘सुपर चंदनाची’ झाडे आहेत, असे समजण्यास हरकत नाही.

पद्धत कशी आहे?

या ‘सेन्सेक्स’ किंवा ‘निफ्टी’साठी निवडलेल्या शेअरच्या ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ची किंमत किंवा ‘वेटेज’ १०० धरले जाते आणि त्या प्रमाणात प्रत्येक शेअरचे ‘वेटेज’ काढले जाते. उत्तम शेअर जास्त ‘वेटेज’ दर्शवतात.

उदाहरणार्थ -

नऊ सप्टेंबर २०२१ रोजी ‘सेन्सेक्स’ ५८,३३४ आणि ‘निफ्टी’ १७,३७९ या उच्चांकी पातळीवर असताना कोणते शेअर बाजार हलवत होते, हे सहज काढता येते. ३० शेअरचे ‘वेटेज’ १०० असताना पुढील शेअर आपले स्वतःचे ‘वेटेज’ दाखवित होते-

(लेखक शेअर बाजाराचे अनुभवी जाणकार आहेत.)

loading image
go to top