esakal | सोने खरेदीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय; फसवणुकीला बसणार आळा
sakal

बोलून बातमी शोधा

gold

सध्या भारतात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. या कोरोनाच्या प्रसारामुळे बरेच जण घाबरले आहेत. याकाळात लोकं गर्दीच्या ठिकाणी तसेच बाजारात जाणे टाळत आहेत.

सोने खरेदीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय; फसवणुकीला बसणार आळा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: सध्या भारतात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. या कोरोनाच्या प्रसारामुळे बरेच जण घाबरले आहेत. याकाळात लोकं गर्दीच्या ठिकाणी तसेच बाजारात जाणे टाळत आहेत. त्यामुळे या काळात बरेच जण ऑनलाईन शॉपिंगवर भर देताना दिसत आहेत. यामध्ये दाग-दागिण्यांचेही प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. पण बऱ्याच ग्राहकांच्या मनात भीती आहे ती फसवणूकीची. या व्यवहारात जर आपली फसवणूक झाली तर? या भितीने बरेच जण ही ऑनलाइन शॉपिंग टाळत आहे. पण आता दागिण्यांचे ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. आता तुम्ही घेतलेले दागिणे खरं आहे की खोटं तुम्हाला घरी बसून ठरवता येईल. यासाठी आता भारत सरकारने सोन्याचे दागिने घेणाऱ्या ग्राहकांसाठी  बीस ( BIS-Care for users to check the hallmark and ISI quality of any product) नावाचं एक अॅप सुरू केलं आहे. या अ‍ॅपचा ग्राहकांना दागिण्यांची खातरजमा करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या अ‍ॅपच्या मदतीने ग्राहकांना वस्तूंशी संबंधित कोणतीही तक्रार, परवाना, नोंदणी आणि हॉलमार्कची सत्यता तपासता येणार आहे. वाढत्या फसवणूकीच्या प्रकारामुळे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी गेल्या महिन्यातच बीआयएस केअर अ‍ॅप लॉन्च केलं आहे. या अ‍ॅपमध्ये घेतलेल्या सोन्याचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक लगेच याची तक्रार करू शकतात. बीआयएसने सुमारे 37 हजार मानके जारी केले आहेत, गुणवत्ता नियंत्रण ऑर्डर जारी केल्यामुळे परवाने वाढण्याची अपेक्षा आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बीआयएस-केअर अॅप सध्या केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. बीआयएस-केअर हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येऊ शकतं. बीआयएस-केअर अ‍ॅप वापरण्यासही खूप सोपं आहे. बीआयएस-केअर अॅप डाउनलोड केल्यावर बीआयएस-केअर अ‍ॅप उघडून त्यात आपले नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी भरा. ग्राहक तिथं उत्पादनांच्या गुणवत्तेची शहनिशा करू शकतो.  बीआयएस-केअर अॅपच्या साहाय्याने ग्राहक आयएसआय मार्क गैरवर्तन, हॉलमार्क यासारख्या विषयांवर तक्रारी दाखल करू शकतात. तसेच इथं नोंदणी गुण, दिशाभूल करणार्‍या जाहिराती आणि बीआयएसशी संबंधित इतर मुद्द्यांविषयीही कोणी तक्रार देऊ शकते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप