esakal | Shaktikanta Das | "2021-22 या आर्थिक वर्षात GDP वाढीचा अंदाज 9.5 टक्क्यांवर"
sakal

बोलून बातमी शोधा

shaktikant das

"2021-22 या आर्थिक वर्षात GDP वाढीचा अंदाज 9.5 टक्क्यांवर"

sakal_logo
By
ओमकार वाबळे

रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यंदाच्या आर्थिक वर्षात होणाऱ्या जीडीपी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात जीडीपी दर ९.५ टक्क्यांवर कायम राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यात Q2 मध्ये 7.9%, Q3 मध्ये 6.8% आणि 2021-22 च्या Q4 मध्ये 6.1% वाढीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची वास्तविक वाढ 17.2% अपेक्षित आहे, असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.

RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चारही तिमाहीत होणाऱ्या बदलांची आकडेवारी जाहीर केली. पुढील आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये दक्षिण आशिया इकोनॉमिक फोकसची बैठक पार पडणार आहे. त्याआधी जागतिक बँकेनेही अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारताची अर्थव्यवस्था दक्षिण आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 2021-22 या चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8.3 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, असे वर्ल्ड बँकेने सांगितले. याच अनुषंगाने आज गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारताच्या आर्थिक वर्ष २०२१-२२ ची जीडीपी आकडेवारी प्रसिद्ध केली.

कोरोनामुळे वाढलेली महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच चलनवाढीवर लक्ष्य ठेवण्यासाठी आर्थिक धोरणात सोयीस्कर बदल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणेला गती मिळत आहे. वाढीच्या आवेगांना बळकटी देणे, महागाई दर देखील अपेक्षेप्रमाणे अनुकूल आहे. आपल्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक मूलभूत घटकांच्या लवचिकतेमुळे हे साधणं शक्य झाल्याचे शक्तिकांत दास म्हणाले.

'रेपो रेट' जैसे थे

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर 4 टक्क्यांवर स्थिर केला आहे. यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे अनुकूल स्थिती कायम ठेवली आहे. तसेच रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.

loading image
go to top