'आरबीआय'च्या संचालक मंडळावर सतीश मराठे

वृत्तसंस्था
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळावर युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष सतीश मराठे यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. ते  ‘सहकार भारती’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत सहकारी अर्थचळवळीचे प्रणेते देखील आहेत. त्याचबरोबर स्वदेशी जागरण मंचाचे सह-संयोजक स्वामीनाथन गुरूमुर्ती यांचीही रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूमुर्ती हे राजकीय तमिळ साप्ताहिक थग्लकचे संपादक आहेत. 

 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंगळवारी रात्री घेतलेल्या विशेष बैठकीत या दोन्ही नियुक्त्यांना मंजुरी दिली. दोन्ही नेमणुका चार वर्षांच्या मुदतीसाठी असतील. या दोन नवीन नेमणुकासह, रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळावर आता 10 सरकारी नियुक्त सदस्य आहेत.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govt appoints S Gurumurthy, Satish Marathe as part-time directors on RBI board