esakal | सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना 83 हजार कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना 83 हजार कोटी

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना 83 हजार कोटी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

अरूण जेटली यांची माहिती 
नवी दिल्ली: पुढील तिमाहीत सार्वजनिक बॅंकांना केंद्र सरकारकडून 83 हजार कोटींचे भांडवली सहकार्य केले जाईल, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरूवारी (ता.20) दिली. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना आर्थिकदृष्ट्या सशमम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे जेटली यांनी सांगितले.
 
बॅंकांना विशेष अनुदानाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 41 हजार कोटींचा निधी दिला जाणार आहे. या प्रस्तावावर गुरूवारी सकाळी संसदेची मंजुरी घेण्यात आली. यामुळे चालू आर्थिक वर्षात बॅंकांच्या पुर्नंभाडवलाचा निधी 1.06 लाख कोटींपर्यंत वाढला आहे. यापूर्वी चालू वर्षात सरकारने पुर्नभांडवलासाठी 65 हजार कोटींची तरतूद केली होती. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधातून (प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन) बाहेरपडण्यासाठी सार्वजनिक बॅंकांना आर्थिकदृष्या सक्षम करून असे जेटली यांनी सांगितले. भांडवली मदतीने बॅंकांनी पत पुरवठ्याची क्षमता वाढेल, असे त्यांनी सांगितले. बुडीत कर्जांचा भार हळुहळू कमी होत असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. 

loading image