वर्षभरात 10 लाखांचा कॅश व्यवहार केल्यास भरावा लागणार टॅक्स

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जून 2019

केंद्रीय अर्थसंकल्प 5 जुलैला जाहीर होणार असून, या अर्थसंकल्पात सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. गरिब आणि मध्यमवर्गीयांवर आणखी बोजा टाकण्यापेक्षा आर्थिक गैरव्यवहारांना चाप बसविण्यासाठी सरकार हा निर्णय घेणार आहे. या निर्णयामुळे डिजीटल पेमेंटच्या सुविधेलाही चालना मिळणार आहे.

नवी दिल्ली : वर्षभरात तुम्ही तुमच्या बँक खात्यातून 10 लाख रुपयांची रोख रक्कम काढल्यास तुम्हाला आता प्राप्तीकर (टॅक्स) भरावा लागण्याची शक्यता आहे.

काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी आणि डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेण्याचे ठरविले असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकाच्या बँक खात्याला आधार लिंक असून, त्याद्वारे त्याने केलेल्या व्यवहारांची माहिती मिळू शकते. एखाद्या व्यक्तीने आपल्या खात्यातून वर्षभरात 10 लाखांहून अधिक रोख व्यवहार केल्याचे आढळल्यास त्याला कर भरावा लागेल. सध्या 50 हजारांहून अधिक रोख रक्कम भरताना पॅनची माहिती देणे अनिवार्य आहे. आता आधारमुळे मोबाईल कनेक्ट असल्याने सर्व व्यवहारांची माहिती मिळते आणि गैरवापर कमी झाला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 5 जुलैला जाहीर होणार असून, या अर्थसंकल्पात सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. गरिब आणि मध्यमवर्गीयांवर आणखी बोजा टाकण्यापेक्षा आर्थिक गैरव्यवहारांना चाप बसविण्यासाठी सरकार हा निर्णय घेणार आहे. या निर्णयामुळे डिजीटल पेमेंटच्या सुविधेलाही चालना मिळणार आहे. आरबीआयने नुकतेच एनईएफटी आणि आरटीजीएसवरील शुल्क माफ केले होते. त्यापाठोपाठ आता हा निर्णय घेण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govt mulling tax on cash withdrawal of Rs 10 lakh a year