जीएसटीची कमाई जुलैत घटली

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 2 August 2020

सरकारला जीएसटी वसुलीपोटी होणारी कमाई जूनच्या तुलनेत जुलैमध्ये घटली आहे. जूनमध्ये ९०९१७ कोटी रुपयांची मिळकत जीएसटी वसुलीतून झाली होती. यात सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांची घट होऊन सरकारला ८७४२२ कोटी रुपये मिळाले.

नवी दिल्ली - सरकारला जीएसटी वसुलीपोटी होणारी कमाई जूनच्या तुलनेत जुलैमध्ये घटली आहे. जूनमध्ये ९०९१७ कोटी रुपयांची मिळकत जीएसटी वसुलीतून झाली होती. यात सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांची घट होऊन सरकारला ८७४२२ कोटी रुपये मिळाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारला एकूण जीएसटी वसुलीपैकी सीजीएसटीअंतर्गत १६१४७ कोटी रुपये, एसजीएसटी वसुलीतून २१४१८ कोटी रुपये तर आयजीएसटी वसुलीतून ४२५९२ कोटी रुपये जुलैत मिळाल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. यामध्ये ७२६५ कोटी रुपये उपकराचाही समावेश आहे. सरकारने यंदाच्या जुलैमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ८६ टक्के रक्कम वसूल केली. एकंदरीत रक्कम कोरोना संकटाची झळ बसलेल्या एप्रिल आणि मे महिन्यांच्या तुलनेत अधिक आहे. मे मध्ये ६२,००९ कोटी रुपये आणि त्याआधी एप्रिलमध्ये ३२,२९४ कोटी रुपये जीएसटीची वसुली झाली. अर्थात, जूनमध्ये वसुली अधिक असली तरी लॉकडाउमुळे रखडलेला कर भरणा मागील महिन्यात मोठ्या संख्येने करदात्यांनी केला होता.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GST revenue declined in July

Tags
टॉपिकस
Topic Tags: