esakal | अर्थव्यवस्था येतेय रुळावर; तब्बल 8 महिन्यांनंतर 1 लाख कोटींहून अधिक जीएसटी वसूल
sakal

बोलून बातमी शोधा

GST

31 ऑक्टोबरपर्यंत दाखल झालेल्या  GSTR-3B रिटर्न्सची एकूण संख्या सुमारे 80 लाखांपर्यंत पोहोचली आहे.

अर्थव्यवस्था येतेय रुळावर; तब्बल 8 महिन्यांनंतर 1 लाख कोटींहून अधिक जीएसटी वसूल

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: 2020 वर्षात फेब्रुवारीनंतर प्रथमच ऑक्टोबरमध्ये 1 लाख कोटींपेक्षा जास्त जीएसटी जमा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये एकूण 1 लाख 5 हजार 155 कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली आहे. जमा झालेल्या जीएसटीपैकी 19,193 कोटी रुपये सीजीएसटी (CGST), 25,411 कोटी एसजीएसटी (SGST) आणि 52,540 कोटी आयजीएसटीचे (IGST) आहे. आयजीएसटीमध्ये मालाच्या आयातीतून 23,375 कोटी रुपये जमा झाले आहेत. तर 8,011 कोटी रुपये उपकर म्हणून जमा झाले असून त्यापैकी 932 कोटी रुपये आयात केलेल्या वस्तूंवर (Imported Goods) आकारण्यात आलेल्या उपकरातून जमा झाले आहेत.

31 ऑक्टोबरपर्यंत दाखल झालेल्या  GSTR-3B रिटर्न्सची एकूण संख्या सुमारे 80 लाखांपर्यंत पोहोचली आहे. आयजीएसटीमधून नियमन तडजोड (Regular Settlement) म्हणून सरकारने 25,091 कोटी रुपये सीजीएसटी आणि 19,427 कोटी रुपयांचा एसजीएसटी भरला आहे.

ऑक्टोबरमध्ये पैसे भरल्यानंतर केंद्र सरकारचा एकूण तडजोडीच्या रकमेचा हिस्सा 44,285 कोटी रुपयांवर आला आहे. तर राज्यांकडे एसजीएसटी म्हणून 44,839 कोटी रुपये आले आहेत.

अर्थव्यवस्था पुन्हा ट्रॅकवर येत असल्याची चिन्हे-
मागील वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरमध्ये एकूण जीएसटी महसूल  (GST Revenue) 10 टक्क्यांनी वाढला आहे. आयातीच्या माध्यमातून मिळलेला महसूल ऑक्टोबरमध्ये 9 टक्क्यांनी अधिक झाला आहे. देशांतर्गत व्यवहारांच्या आधारे जीएसटीचा महसूल 11 टक्क्यांनी वाढला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तुलनेत जीएसटी महसुलात अनुक्रमे 14 टक्के, 8 टक्के आणि 5 टक्के वाढ झाली आहे. या आकडेवारीमुळे देशाची अर्थव्यवस्था मार्गावर येत असल्याचे दिसत आहे.

कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक जीएसटीची वसुली-
ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 15,799 कोटी रुपयांचा जीएसटी वसुली झाली आहे. त्यानंतर कर्नाटकात 6,998 कोटी, तामिळनाडूत 6,901 कोटी आणि उत्तरप्रदेशात 5,471 कोटी रुपयांचा जीएसटी वसूल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2019 च्या तुलनेत ऑक्टोबर 2020 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये 21%, हिमाचल प्रदेशात 3%, पंजाबमध्ये 16%, उत्तराखंडमध्ये 10%, हरियाणात 19%, राजस्थानमध्ये 22%, यूपीमध्ये 7%, पश्चिम बंगाल में 15%, झारखंड मध्ये 23% बिहारमध्ये 15% जीएसटीची वसुली करण्यात आली. तर दिल्लीत ८ टक्के कमी जीएसटीची वसुली झाली आहे.

(edited by- pramod sarawale)