हॅचबॅकचे पर्याय

हॅचबॅकचे पर्याय

भारतात सर्वाधिक विक्री ही हॅचबॅक म्हणजे चार मीटरपेक्षा रुंदी कमी असणाऱ्या कारची होते. त्यामुळे या सेगमेंटमध्ये कंपन्यांमध्ये मोठी चुरस आहे. त्यामुळे कारची अनेक मॉडेलही उपलब्ध आहेत. यामध्ये कोणते पर्याय आहेत, याचा आढावा...

रस्त्यावरील वाढलेल्या वाहतुकीमुळे होणारे ट्रॅफिक जाम, वाढलेला खर्च, वाढते इंधन दर या सगळ्या गोष्टी स्वतःचे वाहन घेण्याची इच्छा असणाऱ्याला परावृत्त नक्कीच करू शकत नाही. कारण, आपल्याकडे अनेक गोष्टी या भावनिक आहेत आणि आपल्याकडे स्वतःची पहिली चारचाकी गाडी घेणे हे नक्कीच एकासाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला आनंद देणारे आहे. भारतात प्रगत देशांच्या तुलनेत स्वतःचे चारचाकी वाहन असणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच भारतात वाहनांच्या बाजारपेठेसाठी चांगला वाव असल्याने अनेक परकी कंपन्यांनी त्यांची वाहने भारतात लाँच केली आहेत. पण गेल्या दीड वर्षापासून वाहन उद्योग आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे.

सातत्याने वाढीची सवय असणाऱ्या या उद्योगाला विक्रीतील घटीचा सामना करावा लागला आहे. पण तरीही कंपन्यांनी त्यांच्या पातळीवरही या परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच विविध प्रकारच्या ऑफर्स फेस्टिव्ह काळात दिल्या गेल्या. परिणामी वाहन विक्रीला चालना मिळाली. पण इन्व्हेंटरी म्हणजे उत्पादित झालेल्या वाहनांची संख्या लक्षात घेता ती विकण्यासाठी कंपन्यांना नक्कीच प्रयत्न करावे लागणार आहेत. केवळ ऑफर देऊन ग्राहक आकर्षित होत नाहीत. त्यामुळे काळानुसार ग्राहकांना नवीन काही दिले पाहिजे, असे कंपन्यांनाही वाटते. म्हणूनच काही कंपन्यांनी सादर केलेली नवी मॉडेल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहेत तर काही मॉडेलबाबत उत्सुकता आहे. अशावेळी कोणत्या सेगमेंटमधील कोणती कार आपल्याला चांगला पर्याय असू शकते, हे जाणून घेऊ. 

हॅचबॅक

या सेगमेंटमध्ये सुरुवातीस मारुती सुझुकीची मक्तेदारी होती आणि अजूनही आहे. पण, अन्य कंपन्यांमुळे नक्कीच स्पर्धा निर्माण झाली आहे. मारुती सुझुकीची अल्टो ८०० व अल्टो के १० या कार या प्रामुख्याने यात येतात. तसेच, यापेक्षा थोडी प्रीमिमय स्टाइलची नवी कार एसप्रेसो ही मारुतीने लाँच केली आहे. या कारचे डिझाइन एसयूव्ही इन्स्पायर्ड असल्याने ही अर्बन डिझाइनची कार वाटते. पण, या कारला तोडीस तोड अशी रेनॉची क्विड ही कार आहे. रेनॉने क्विडचे रिफ्रेश्‍ड व्हर्जन नुकतेच बाजारात आणले आहे. या कारच्या पूर्वीच्या मॉडेलने अल्टोला चांगली टक्कर दिलेली आहे. एसयूव्ही इन्स्पायर्ड लुक, नवी फीचर्स यामुळे बाजारपेठेतून या कारला चांगला प्रतिसाद या पूर्वी मिळालेला आहे. बाजारपेठेतील संभाव्य स्पर्धा लक्षात घेऊन रेनॉने क्विडच्या फ्रंट ग्रिल, लॅम्प, बोनेट डिझाइनमध्ये बदल केला असून, कारला प्रीमियम लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, या कारमध्ये अनेक फीचर ही स्टॅंडर्ड आहेत. तसेच, ही कार दोन इंजिन सीसीच्या पर्यायात उपलब्ध आहे. पण, कारला सध्या बीएस सिक्‍स इंजिन नाही. भविष्यात ते नक्कीच येणार आहे. त्यामुळे ही कार मारुती सुझुकीच्या एसप्रेसोपेक्षा स्वस्त आहे. क्विड ८०० सीसी व १००० सीसीमध्ये उपलब्ध आहे. एसप्रेसोलाही १००० सीसीचे इंजिन आहे. या सेगमेंटमधील कार घ्यायची असल्यास नक्कीच अल्टो हा आता पर्याय नाही. एसप्रेसो व क्विड या दोन पर्यायी कारचा नक्कीच विचार करता येईल.

कॉम्पॅक्‍ट हॅच

या सेगमेंटमध्ये अनेक वर्षे मारुती सुझुकी वॅगन आर व ह्युंदाई स्टॅंट्रो या दोन कारमध्ये प्रामुख्याने स्पर्धा राहिली आहे. दोन्ही कारची विक्री गेल्या दशकभरात खूप चांगली झाली. तसेच, पुढेही आपला या सेगमेंटमधील ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी आपापल्या कारची पूर्णतः नवी मॉडेल बाजारात आणली आहेत. दोन्ही टॉलबॉय प्रकारच्या कार आहेत. दोन्ही कारना १००० सीसीचे इंजिन आहे. पण, स्टाइल, डिझाइन, परफॉर्मन्सचा विचार केल्यास नवी वॅगनआर ही चांगली आहे.

मिड हॅचबॅक

स्विफ्ट ही या सेगमेंटमधील सर्वाधिक विकली गेलली कार आहे आणि अजूनही या कारला चांगली मागणी आहे. पण, ह्युंदाई मोटरची ग्रॅंड आय १० ही कारही आहे. दोन्ही कार या १००० पेक्षा जास्त सीसीच्या आहेत. तसेच, दोन्ही गाड्यांचा चाहतावर्गही वेगळा आहे. पण, फीचर्स, प्राइस, मायलेज, रिसेल व्हॅल्यू या दोन्हींचा विचार केल्यास मिड हॅचबॅकमध्ये स्विफ्ट व ग्रॅंड आय १० या दोन्ही कारपैकी कोणतीही कार निवडता येईल.  
प्रीमियम हॅच

या सेगमेंटमध्ये पुन्हा ह्युंदाई व मारुती यांच्यात स्पर्धा असून, ह्युंदाईची आय २० व मारुती बलेनो एकमेकांसमोर आहेत. दोन्ही कारचा लुक चांगला असून, परफॉर्मन्स उत्तम असून, व्हॅल्यू फॉर मनी म्हणून या कारकडे पाहता येते. पण, या सेगमेंटमध्ये येत नसणारी पण किमतीमुळे जवळपास वाटत असणारी टाटा मोटर्सची नेक्‍सॉन ही सुरक्षिततेचे मानक पूर्ण करणारी अर्बन डिझाइन असणारी नेक्‍सॉन आहे. नेक्‍सॉनमधील फीचर प्रीमियम असून, इंजिनही ताकदवान आहेत. तसेस, भारतीय रस्ते लक्षात घेऊन सामान्य कारपेक्षा नेक्‍नॉनचा ग्राउंड क्‍लिअरन्स अधिक आहे. त्यामुळे सुरक्षितचा मुद्दा लक्षात घेतल्यास नेक्‍सॉनही पर्याय वाटू शकते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com