एचडीएफसी बँकेला ८७५८ कोटींचा नफा 

वृत्तसंस्था
Sunday, 17 January 2021

देशातील सर्वांत मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेने चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्‍या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. या तिमाहीमध्ये बँकेला ८७५८.३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

नवी दिल्ली - देशातील सर्वांत मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेने चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्‍या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. या तिमाहीमध्ये बँकेला ८७५८.३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

मागील वर्षी याच कालावधीत बँकेचा निव्वळ नफा ७४१६.४८ कोटी रुपये होता. म्हणजेच डिसेंबर तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा १८.१ टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर बँकेच्या तिमाहीतील व्याज उत्पन्नामध्ये १५.१ टक्क्यांनी वाढ झाली आणि ते १६,३१७.६ कोटी रुपयांवर पोचले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

एचडीएफसी बँकेने म्हटले आहे, की २०२०-२१ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये बँकेला एकूण २३,७६०.८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्याचवेळी बँकेचा एकूण ताळेबंद १६,५४,३३८ कोटी रुपयांवर गेला आहे. डिसेंबर तिमाहीत बँक ठेवी १९.१ टक्क्यांनी वाढून १२,७१,१२४ कोटी रुपयांवर पोचल्या आहेत. 

बँकेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर जगदीशन यांच्या नेतृत्वात एचडीएफसी बँकेचा हा पहिलाच तिमाही निकाल आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HDFC Bank makes Net profit of Rs 8758 crore