'HDFC'चा ग्राहकांना अलर्ट मेसेज! 1 जानेवारीपासून बदलणार 'हा' नियम

HDFC बॅंकेचा ग्राहकांना अलर्ट मेसेज! 1 जानेवारीपासून बदलणार 'हा' नियम
'HDFC'
'HDFC'esakal
Summary

तुम्ही जर HDFC बॅंकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

तुम्ही जर HDFC बॅंकेचे (HDFC Bank) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरेतर, बॅंकेने ग्राहकांना सूचित केले आहे, की मर्चंट वेबसाइट (Merchant Website) / ऍपवर सेव्ह केलेले तुमचे HDFC बॅंक कार्ड तपशील हटवले जातील. आरबीआयच्या (Reserve Bank Of India - RBI) आदेशानंतर बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. बॅंकेने आपल्या ग्राहकांना एका संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. आरबीआयने हा निर्णय ग्राहकांच्या कार्डचा तपशील सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने घेतला आहे. (HDFC Bank sent an alert message to its customers regarding the change of rules from January 1)

'HDFC'
Covid लस न घेतलेल्या Google कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्‍यात!

तथापि, नवीन नियमानुसार ग्राहकांना प्रत्येक वेळी पेमेंट करताना संपूर्ण कार्ड तपशील प्रविष्ट करावा लागेल. आतापर्यंत ग्राहक एकदाच कार्ड तपशील प्रविष्ट करायचे, त्यानंतर प्रत्येक वेळी ऍप किंवा मर्चंट वेबसाइटवर तपशील उपलब्ध असायचे. याशिवाय आरबीआयने ग्राहकांना टोकनचा पर्याय निवडण्याचा पर्यायही दिला आहे. हे नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत.

'HDFC'
Vi युजर्सची चांदी! मिळतोय मोफत बंपर डेटा; जिओ-एअरटेलची वाढली डोकेदुखी

काय आहे टोकन सिस्टीम?

टोकन व्यवस्था (Tokenization) हा कार्ड तपशील प्रदान करण्याचा पर्यायी मार्ग आहे. या अंतर्गत मूळ कार्ड तपशिलांऐवजी अद्वितीय पर्यायी कोड तपशील तयार केला जातो. याला टोकन म्हणतात. केंद्रीय रिझर्व्ह बॅंकेने 2019 मध्ये पहिल्यांदा टोकन प्रणालीचा उल्लेख केला होता. याने अधिकृत कार्ड नेटवर्कना विनंती केल्यावर टोकन सेवा प्रदान करण्याची परवानगी दिली. टोकन पर्याय 1 जानेवारी 2022 पासून डेबिट (Debit Card) आणि क्रेडिट कार्ड (Credit Card) दोन्हींवर उपलब्ध असेल. हे फक्त देशांतर्गत व्यवहारांसाठी लागू आहे. म्हणजेच हा नियम आंतरराष्ट्रीय व्यवहारांना लागू होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com