उत्पादनप्रक्रियेतील कोळशाचा वापर हिंदुस्थान युनिलीव्हरकडून बंद

बायोमास व बायोडिझेलचा वापर सुरु
coal
coal sakal media

मुंबई : ग्राहकोपयोगी वस्तू (consumer beneficial objects) बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी हिंदुस्थान युनिलीव्हरने (hindustan unilever production) उत्पादनप्रक्रियेतील कोळशाचा वापर (coal production), पर्यावरणाच्या जपणुकीसाठी (environmental Care) पूर्णपणे बंद केला असून त्याऐवजी त्यांनी बायोमास व बायोडिझेलचा वापर (Biomass based diesel) सुरु केला आहे.

याखेरीज कंपनीतर्फे सौरउर्जा आणि पवनउर्जा वापरावरही भर दिला जात आहे. यामुळे कार्बनडायऑक्साईडचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने पर्यावरण शुद्ध राहील, अशी ग्वाही कंपनीने दिली आहे. यामुळे कंपनीच्या खर्चातही बचत झाली असून कोळसा आयात करण्यासाठी लागणाऱ्या देशाच्या परकीय चलनाचीही बचत होईल. कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत बॉयलर चालविण्यासाठी कोळशाचा वापर होत होता. मात्र आता स्वच्छ इंधनाचा वापर सोपा व्हावा म्हणून या बॉयलरमध्येही बदल करण्यात आले आहेत. कंपनीच्या होमकेअर प्रकल्पांपैकी एका प्रकल्पात कोळशाचा वापर बंद झाल्याने कंपनीची साडेतीन कोटी रुपयांची बचत झाली. तर चाळीस लाख किलो कार्बनडायऑक्साईडचे उत्सर्जन कमी झाले.

कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेतून पर्यावरणास घातक वायूंचे शून्य उत्सर्जन सन 2030 पर्यंत करण्याचे कंपनीचे ध्येय आहे, असे एचयूएल चे अध्यक्ष संजीव मेहता म्हणाले. तर या बदलामुळे कारखान्यांभोवतीची हवेची गुणवत्ता सुधारते तसेच बायोमास खरेदीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढते. आम्ही अधिग्रहण केलेल्या कंपन्यांमध्येही हा बदल करण्यात आला, असे एचयूएलचे कार्यकारी संचालक (सप्लाय) विलेम उइयेन म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com