नवीन वर्षात घरगुती उपकरणे महागणार 

टीम ई-सकाळ
Tuesday, 29 December 2020

यंदाचे वर्ष संपायला अजून काही दिवस शिल्लक आहेत. तर येणाऱ्या 2021 नवीन वर्षात काही बदल होणार आहेत. नवीन वर्षापासून नवीन नियम लागू होणार आहेत. आणि काही जुन्या नियमांमध्ये बदल होणार आहे. या सर्वांच्यासोबतच नवीन वर्षात महागाईचा धक्का देखील बसण्याची शक्यता आहे.

यंदाचे वर्ष संपायला अजून काही दिवस शिल्लक आहेत. तर येणाऱ्या 2021 नवीन वर्षात काही बदल होणार आहेत. नवीन वर्षापासून नवीन नियम लागू होणार आहेत. आणि काही जुन्या नियमांमध्ये बदल होणार आहे. या सर्वांच्यासोबतच नवीन वर्षात महागाईचा धक्का देखील बसण्याची शक्यता आहे. आगामी वर्षात घरगुती उपकरणांची किंमत वाढणार आहे. टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन यासारख्या घरगुती उपकरणांच्या किंमतींमध्ये 10% वाढ अपेक्षित आहे.

नवीन वर्ष 2021 मध्ये एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन यासारख्या घरगुती उपकरणांच्या किंमतीत 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ही उपकरणे बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल कॉपर, अ‍ॅल्युमिनियम, स्टील यांच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच मालवाहतूक देखील वाढली आहे. आणि त्यामुळे  घरगुती उपकरणांच्या किमतीत वाढ होणार आहे. टीव्ही पॅनल्सच्या किंमतीत 200 टक्क्यांनी वाढ झाल्याचे उत्पादित कंपन्यांचे म्हटले आहे. त्याचबरोबर या उपकरणांमध्ये वापरण्यात येत असलेले प्लास्टिक क्रूडच्या किंमती वाढल्यामुळे महाग झाले आहे. आणि त्याचा फटका घरगुती उपकरणांच्या किमतीत होणार असून, या वस्तूंची किंमत नवीन वर्षापासून वाढणार आहे. 

नव्या वर्षात सोन्याच्या किमती गाठू शकतात उच्चांक

एलजी, पॅनासोनिक, थॉमसन अशा काही घरगुती उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी नवीन वर्षात त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कॉपर या धातूची मागणीनुसार सप्लाय कमी असून, अ‍ॅल्युमिनियमसारख्या धातूंच्या किंमती देखील वाढल्या असल्याचे या कंपन्यांनी म्हटले. तसेच मालवाहतुकीच्या किंमती 4 ते 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आणि त्याचा परिणाम उत्पादनाच्या निर्मितीवर होत असून, अशा परिस्थितीत उत्पादन खर्च 20-25 टक्क्यांनी वाढला आहे. आणि त्याचा प्रभाव उपकरणांच्या किंमती वाढण्यात होणार आहे. 

एलजीने पुढील वर्षात आपल्या घरगुती उपकरणांच्या किमती 7-8 टक्क्याने वाढू शकत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पॅनासोनिकने देखील 6-7 टक्क्यांनी वस्तूंच्या किमती वाढणार असल्याचे सांगितले आहे. तर सोनी कंपनीने पुढील वर्षात बाजाराचा अंदाज घेतल्यानंतर आपल्या वस्तूंच्या किंमती निश्चित करणार असल्याचे म्हटले आहे.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home appliances will become more expensive in the upcoming new year