
या वाढीनंतर घर बांधणे अधिक खर्चिक ठरू शकते.
घर बांधणं आणखी महागणार; काय आहे कारण? जाणून घ्या
गेल्या अनेक महिन्यांपासून कोळशाच्या किमतीमुळे पोलाद उत्पादक (Steel producer) कंपन्यांनी पोलादाच्या दरात टनामागे दोन हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. या वाढीनंतर घर (House) बांधणे अधिक खर्चिक ठरू शकते.
हेही वाचा: स्वप्नांसाठी दररोज १० किमी धावून गाठतो घर, पाहा प्रेरणादायी व्हिडिओ
माहितीनुसार, जेएसडब्ल्यू स्टीलने 23 मार्चपासून रेबार स्टीलच्या किंमतीत प्रतिटन 1250 रुपयांची वाढ केली आहे. घरांच्या बांधकामात वापरण्यात येणारा सारिया रेबारपासून बनविला जातो. सरकारी कंपनी सेलने हॉट रोल्ड कॉइल (HRC) आणि कोल्ड रोल्ड कॉइल (CRC) च्या किंमतीत प्रति टन 1500रुपयांची वाढ केली आहे.
जिंदाल स्टील अँड पॉवरनेही स्टीलच्या दरात प्रतिटन 1500 रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर एचआरसीची किंमत प्रतिटन 72500 ते 73500 रुपये, सीआरसीची किंमत 78500 रुपयांवरून 79000 रुपये प्रतिटन आणि रेबारची किंमत प्रति दहा 71000 रुपयांवरून 71500 रुपयांवर गेली आहे.
हेही वाचा: घर खरेदी करताना येणार नाही अडचण; Home Loan घेताना करा हे काम
एप्रिलमध्ये किंमती आणखी वाढू शकतात, असे या उद्योगाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे. एच.आर.सी.चा वापर रेल्वे रूळ, अवजड यंत्रसामग्री आणि उच्च तापमानात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये केला जातो. कमी तापमानात काम करणारी यंत्रसामग्री आणि इतर वस्तू सीआरसीच्या माध्यमातून तयार केल्या जातात.
ईव्ही आठ टक्क्यांपर्यंत महाग असू शकतात.
कच्चा माल आणि उपकरणांच्या किंमतीमुळे आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) किमती वाढू शकतात. टू-व्हीलर ते फोर व्हीलर ईव्हीच्या किमती सहा ते आठ टक्क्यांनी वाढू शकतात, असे या उद्योगाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे. टाटा मोटर्स (Tata Motors)आणि अॅथर एनर्जीने यापूर्वीच ईव्हीच्या किंमतीत वाढ केली आहे. हिरो इलेक्ट्रिक आणि कायनेटिक ग्रीन एनर्जी वाढीच्या प्रमाणात विचार करीत आहेत.
Web Title: House Will Be More Expensive Steel Prices
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..