esakal | MMR | मुंबईसह 7 शहरांमध्ये घरांच्या विक्रीत 113 टक्क्यांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

buildings in mumbai

मुंबईसह 7 शहरांमध्ये घरांच्या विक्रीत 113 टक्क्यांची वाढ

sakal_logo
By
ओमकार वाबळे

कोरोना काळात स्थावर मालमत्तांचे दर कमी झाले होते. त्यानंतर बाजार काही अंशी पूर्वपदावर येऊ लागला. यावर्षी भारतातील मालमत्ता विक्रीत हैदराबादने उच्चांक गाठला आहे. बाजारभाव वाढल्यानंतरही २०२१ मध्ये 6,735 युनिट मिळवले. Q3 2020 च्या तुलनेत ही 300 टक्क्यांहून अधिक वाढ आहे. मागील ४-५ तिमाहीत झालेल्या सततच्या पुरवठ्यामुळे हे शक्य झाले.

ANAROCK च्या एका अहवालानुसार, देशातील पहिल्या ७ शहरांमध्ये घरांच्या विक्रीत 113 टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वाधिक विक्री (33%) मुंबई महानगर (MMR) मध्ये झाली आहे. याचसोबत नॅशनल कॅपिटल रिजन(NCR) मध्ये 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2020 च्या तुलनेत मालमत्तेच्या किंमती सरासरी 3 टक्के वाढल्या आहेत.

बेंगळुरूतही गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% वाढ झाली आहे. याच कालावधीत 4 हजार 975 रुपये प्रति चौरस फुटांवरून भाव 5 हजार 150 रुपये प्रति चौरस फुटांवर गेले आहेत.

भारतातील पहिल्या 7 शहरांमध्ये नव्याने बांधलेल्या मालमत्तांचे दर झपाट्याने वाढले आहेत. याचे युनिट्स 2020 मध्ये 32,530 होते. ते 2021 मध्ये अंदाजे 64,560 युनिट्स झाले आहेत. मुंबई मेट्रोपोलेटियन भागात तिमाहीत सर्वाधिक नवे (अंदाजे 16,510 युनिट्स) होते. तर हैदराबादमधील पुरवठा दर 14,690 युनिट्स होता.

मध्यम वर्ग (घरांची किंमत 40-80 लाख रुपये) आणि प्रीमियम घरे (किंमत 80 लाख ते 1.5 कोटी रुपये) अनुक्रमे 41% आणि 25% आहे. नव्याने होणाऱ्या पुरवठ्यावर हे सर्वात उच्चांकी आहे. परवडणाऱ्या घरांमध्ये (ज्याची किंमत <40 लाख रुपये आहे) तिमाहीत त्याचा पुरवठा हिस्सा 24% पर्यंत कमी झाला.

इतर शहरांच्या तुलनेत MMR आणि पुण्यातही तिमाहीत लक्षणीय विक्री वाढ झाली. MMR मध्ये 128% (अंदाजे 20,965 युनिट) आणि पुण्यात 100% (अंदाजे 9,705 युनिट्स).

एनसीआर आणि बेंगळुरूमध्ये 2021 मध्ये अंदाजे विक्री वाढली. Q3 2020 च्या तुलनेत अनुक्रमे 97% (अंदाजे 10,220 युनिट) आणि 58% (अंदाजे 8,550 युनिट).

चेन्नईने 2021 मध्ये अंदाजे 3,405 युनिट विकले. 2020 पेक्षा ही 113 टक्क्यांची लक्षणीय वाढ होती.

कोलकातामध्ये Q3 2021 मध्ये Q3 2020 च्या तुलनेत विक्री वाढलीय. या तिमाहीत 3,220 युनिट्सची विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे.

loading image
go to top