SBI मध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी

SBI मध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी महत्वाची आणि कामाची बातमी आहे.  अनेकदा तुम्हाला खात्याचं स्टेटमेंट काढण्यासाठी एटीएममध्ये किंवा बँकेत जायची गरज नाही. घरबसल्या मोबाईलवरुन तुम्ही बँकेचं स्टेटमेंट मोबाइलवरही डाउनलोड करु शकता किंवा प्रिंट काढू शकता. याच्या तीन सोप्या पद्धती तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये अॅप, इंटरनेट बँकिंग आणि मिस्ड कॉल व एसएमएस सुविधांचा समावेश आहे.  

अॅपद्वारे कसं पाहाल?
सर्वात आधी तुम्ही योनो एसबीआय अॅप मोबाइलमध्ये डाउनलोड करुन लॉग इन करा. त्यानंतर अकाउंट्सवर क्लिक करा. तुमच्यासमोर अकाउंट/अकाउंट्स असे दोन पर्याय दिसतील.   > या पर्यायवर क्लिक करा. तुमच्यासमोर बँकेतील व्यवहाराची सर्व माहिती येईल. येथे एनव्हलोप म्हणजेच लिफाप्याच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट बँकेतील रजिस्टर ईमेलवर पाठवण्यात येईल. एनव्हलोप आयकॉनआधी असणाऱ्या एका आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मोबईलवर स्टेटमेंट डाऊनलोडही होईल.  

इंटरनेट बँकिंग -
सर्वात आधी https://www.onlinesbi.com/  या संकेतस्थळावर जाऊन इंटरनेट बँकिगमध्ये लॉगइन करा. त्यानंतर माय अकाउंट्स अॅण्ड प्रोफाइलवर जा. अकाउंट स्टेटमेंटवर पर्यायवर जा. डाव्या बाजूला असलेल्या क्विक लिंकमध्येही स्टेटमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. अकाउंट नंबर पर्यायवर क्लिक करा.  जर तुमचं एक खातं असेल तर तिथेच दिसेल. येथे स्टेटमेंटचा कालावधीही दिसेल.  स्टेटमेंट दिसण्यासाठी अथवा डाउनलोड करण्यासाठी येथील योग्य तो पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट डाउनलोड करता येईल.

मिस्ड कॉल/एसएमएसद्वारे असं तपासा -
मिस्ड कॉल किंवा एसएमएसद्वारे तुम्ही मोबाइलवरही स्टेटमेंट मिळू शकतं. त्यासाठी 09223866666 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. किंवा वरील क्रमांकावरच ‘MSTMT' लिहून मॅसेज पाठवा. महत्वाची बाब म्हणजे ज्या क्रमांकावरुन तुम्ही मिस्ड कॉल देत आहात किंवा मेसेज पाठवत आहात तो नंबर बँकेमध्ये रजिस्टर असायला हवा.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com