जाणून घ्या, लॉकडाऊनमध्ये पीएफ खात्यातून कसा काढायचा तीन महिन्यांचा पगार!

EPF
EPF

कोरोनामुळे उत्त्पन्नात झालेल्या नुकसानीमुळे लोकांना आपल्या ईपीएफ खात्यातून तीन महिन्यांचा आगाऊ पगार काढता यावा अशी योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषित केली आहे.

जर कोरोनामुळे आपण ईपीएफ खात्यातून पैसे काढण्याचा विचार करीत असाल तर आपल्याला बर्यारच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तुम्ही तुमच्या पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेच्या ७५ % पेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाही. तुम्ही किती व कशी रक्कम काढू शकता हे समझून घ्या.

पीएफकडून पैसे काढण्यासाठी आपण किती पात्र आहात?
कोरोनामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी आपल्याला आर्थिक हातभार लागावा म्हणून हा उपक्रम आहे. अशा गरजांसाठी, आपण सूचना फॉर्म वाचणे आवश्यक आहे. त्यात सर्व माहिती तुम्हाला मिळेल. सर्वप्रथम, आपण पीएफ खात्यातून ३ महिन्यांच्या पगाराची समान रक्कम काढण्यास पात्र आहात का नाही हे समजून घ्या. ऑनलाइनरित्या रक्कम काढण्यासाठी पुढील काही आवश्यक अटी देण्यात आल्या आहेत.
१. UAN सक्रिय केले जाणे आवश्यक आहे. 
२. आपला नोंदणी केलेला आधार यूएएनशी जोडला गेला पाहिजे.
३. आयएफएससी कोड असलेले बँक खाते यूएएन सह जोडलेले असणे आवश्यक आहे.

पीएफकडून 3 महिन्यांचा पगार कसा मिळवायचा?
तीन महिन्यांचा आगाऊ वेतन मिळविण्यासाठी आपण प्रथम ईपीएफओ वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे. https://www.epfindia.gov.in/site_en/index.php येथे तुम्हाला सर्व्हिस टॅबवर क्लिक करून फॉर एम्प्लॉईज या टॅबवर जावे लागेल. त्यानंतर आपल्याला सेवा अंतर्गत बरेच पर्याय सापडतील. यामधून आपल्याला सदस्य यूएएन / ऑनलाइन सेवा (ओसीएस / ओटीसीपी) क्लिक करावे लागेल. 

पीएफची आगाऊ रोख काढण्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा?
पीएफची आगाऊ रोख काढण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया समजून घेवूया.

१. https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface वर लॉगिन करावे
२. ऑनलाईन सेवांवर क्लिक करा, त्याअंतर्गत फॉर्म (फॉर्म-३१,१९,१० सी आणि १० डी) वर जावे.
३. आपल्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे ४ अंक लिहून फॉर्म जतन करावा.
४. 'ऑनलाईन क्लेमसाठी पुढे जा' वर क्लिक करावे
५. आपल्याला या फॉर्ममध्ये सर्व तपशील मिळतील. त्यांना वाचल्यानंतर आणि समजल्यानंतर आपण फॉर्म भरण्यास सुरवात करावी.

यूएएन तपशील कसा भरणार
१. पात्रता आणि पद्धत समजल्यानंतर आपण आपला यूएएन उजवीकडे असलेल्या रकान्यात लिहून कॅप्चा कोड लिहावा.

२. त्यानंतर त्यावर आपला पासवर्ड लिहावा.

३. यानंतर आपला खाते क्रमांक इ. दिसू लागतील. येथे आपण आपले बँक खाते आणि आधार कार्ड नंबर संलग्न केलेला असल्याचे तपासा. जर ते नसेल तर आपण हे पैसे काढू शकणार नाही. यासाठी, आपण प्रथम केवायसी केले पाहिजे.

४. हे सर्व झाल्यावर आपल्याला वरच्या बाजूस ऑनलाइन सेवा नावाचा टॅब दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला वरील बिंदू क्रमांक 3 मध्ये दिलेला तपशील दिसेल. खाते क्रमांक जतन केल्यावर पॉपअप संदेश येईल, ज्यावर होय वर क्लिक करा.

५. येथे नोंद घेणे आवश्यक आहे की एक्झीटची तारीख फॉर्ममध्ये असू नये. अन्यथा आपण पैसे काढू शकणार नाही. 'प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम' वर क्लिक करून, ड्रॉपडाऊन विंडोमध्ये असलेल्या पीएफ ऍडव्हान्सवर क्लिक करावे.

६. येथे पोचल्यावर, 'महामारीचा उद्रेक (COVID-19)' वर क्लिक करून.  तुम्हाला चेकची स्कॅन केलेली प्रत देऊन तुम्हाला काढायची असलेली रक्कम द्यावी लागेल आणि पुरावा जोडावा लागेल.

किती रक्कम काढता येणार?
समजा तुमचा बेसिक पगार + डीए (महागाई भत्ता) १५  हजार रुपये आहे. या प्रकरणात आपण ४५००० रुपयांपेक्षा अधिक दावा करु शकत नाही.  होय, ही रक्कम तुमच्या एकूण पीएफ रकमेच्या ७५% पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ही रक्कम कमी करावी लागेल, कारण तुम्ही एकूण पैकी फक्त ७५% रक्कम काढू शकता. येथे ३ महिन्यांचा पगार आणि एकूण रकमेच्या ७५ % पेक्षा कमी किंवा समान रक्कम काढता येईल. यानंतर, आपल्याला आपले राज्य, जिल्हा, पिन कोड इत्यादी भरावे लागेल. आपण आपल्या पासबुक किंवा चेकबुकची एक प्रत जोडावी लागेल. वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 'आधार ओटीपी मिळवा' वर क्लिक करावे लागेल. आधार लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर येणारा ओटीपी लिहून, तुम्ही रक्कम काढण्यासाठी दावा करू शका. 

किती दिवसात येणार पैसे 
जर आपले केवायसी योग्य असेल आणि तुमचा नियोक्ता ई-स्वाक्षर्यापद्वारे शक्य तितक्या लवकर पडताळणी करत असेल तर, क्लेमची रक्कम ३ ते ५  दिवसांच्या आत आपल्या खात्यावर पोहोचेल. या पद्धतीने तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यावरील रक्कम काढता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com