
कर्ज काढून आणखी किती दिवस सरकारला पैसे पुरवणार? असा सवाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला आहे. कोरोनाच्या संकट काळात बँकेद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘मोनेटायझेशन प्रोग्राम’वरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हे काही फुकटचे जेवण नसल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
नवी दिल्ली - कर्ज काढून आणखी किती दिवस सरकारला पैसे पुरवणार? असा सवाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला आहे. कोरोनाच्या संकट काळात बँकेद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘मोनेटायझेशन प्रोग्राम’वरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हे काही फुकटचे जेवण नसल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राजन यांनी म्हटले आहे की, या सगळ्या बाबींची मोठी किंमत मोजावी लागते. तसेच अशा प्रकारचा कार्यक्रम हे कोणत्याही आर्थिक समस्येचे समाधान असू शकत नाही. सध्याच्या घडीला देश आर्थिक विवंचनेतून जातो आहे. अशात आरबीआयकडून अतिरिक्त नगदी ऐवजाच्या रुपात सरकारी बाँडची खरेदी केली जाते आहे. त्यामुळे देणी वाढत आहेत.सिंगापूरच्या डीबीएस बँकेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका संमेलनात ते बोलत होते.
Edited By - Prashant Patil